Join us

भारताचा विदेशी चलनाचा साठा विक्रमी पातळीवर

By admin | Updated: April 16, 2016 03:06 IST

भारताचा विदेशी चलनाचा साठा ३५९.९१७ अब्ज डॉलरवर गेला आहे. हा त्याचा सार्वकालिक विक्रम ठरला आहे. ८ एप्रिल रोजी संपलेल्या सप्ताहात हा साठा तब्बल १५७.४ दशलक्ष डॉलरने वाढला आहे.

मुंबई : भारताचा विदेशी चलनाचा साठा ३५९.९१७ अब्ज डॉलरवर गेला आहे. हा त्याचा सार्वकालिक विक्रम ठरला आहे. ८ एप्रिल रोजी संपलेल्या सप्ताहात हा साठा तब्बल १५७.४ दशलक्ष डॉलरने वाढला आहे. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने एका निवेदनाद्वारे ही माहिती शुक्रवारी दिली. या निवेदनात म्हटले आहे की, विदेशी मालमत्तांत झालेल्या वाढीमुळे चलनसाठा वाढला आहे. विदेशी चलनसाठ्याचा मोठा हिस्सा विदेशी चलन संपत्तीत सामावलेला असतो. ही संपत्ती १५९.३ दशलक्ष डॉलरने वाढून ३३५.८४५ अब्ज डॉलरवर गेली आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून उचल घेण्याची भारताची क्षमता 0.९ दशलक्षांनी घटून १.५0१ अब्ज डॉलरवर आली आहे. असे असतानाही भारताच्या विदेशी चलनसाठ्यात मात्र वाढ झाली आहे.