Join us

आता ऑस्ट्रेलियातही धावणार भारतातील मेट्रो

By admin | Updated: April 13, 2017 21:12 IST

स्ट्रेलियामध्ये लवकरच "मेड इन इंडिया" लिहिलेल्या मेट्रो धावणार आहे. त्याबरोबरच मध्यपूर्वेती देश आणि आशियातील अन्य देशामध्येही

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 -  ऑस्ट्रेलियामध्ये लवकरच "मेड इन इंडिया" लिहिलेल्या मेट्रो धावणार आहे. त्याबरोबरच मध्यपूर्वेती देश आणि आशियातील अन्य देशामध्येही भारतात तयार झालेल्या मेट्रो धावणार आहेत. भारतात कारखाना उभारून मेट्रोची बांधणी करणाऱ्या अलस्टोम आणि बंबार्डियर इंकने आता भारतातूनच दुसऱ्या देशांमध्ये मेट्रोची निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. 
यासंदर्भातील वृत्त हिंदी संकेतस्थळ नवभारत टाइम्सने दिले आहे. या वृत्तानुसार भारतातील शहरी वाहतुकीच्या वाढत्या बाजार विचारात घेऊन फ्रान्स आणि कॅनडातील बहुराष्ट्रीय  कंपन्यांनी  2008 ते 2010च्या दरम्यान भारतात आपल्या उप्तादनाला सुरुवात केली होती. आता या कंपन्या बाहेरच्या देशातून मिळत असलेल्या मेट्रोच्य कंत्राटांची पूर्तता भारतातूनच करणार आहेत. 
 अलस्टोम आणि बंम्बार्डियर येथील इंजिनियर्स आणि स्वस्तात उपलब्ध असलेल्या श्रमिकांचा उपयोग फोर्ड आणि ह्युंडाई मोटर्स या कंपन्यांसारखा करू इच्छित आहेत. याबाबत अलस्टोम इंडिया कंपनीचे दक्षिण आशियातील व्यवस्थापकीय संचालक भारत सलहोत्रा यांनी सांगितले की, "ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये कंपनीचे पहिले प्रोजेक्ट असेल. आम्ही येथूनच मेट्रोचे कोच सिडनीला पाठवणार आहोत. दक्षिण भारातील आपल्या कारखान्यामधून आम्ही हे कंत्राट पूर्ण करणार आहोत. ऑस्ट्रेलियासोबतच मध्यपूर्व आणि दक्षिणपूर्व आशियवरही आमचे लक्ष आहे."