Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारताची निर्यात मंदावली

By admin | Updated: September 25, 2015 22:12 IST

जागतिक किमतीमधील नरमी आणि कमी झालेली मागणी यामुळे आॅगस्टमध्ये पेट्रोलियम, अभियांत्रिकी, चमडा यासारख्या २३ प्रमुख क्षेत्रांत भारताची निर्यात घटली.

नवी दिल्ली : जागतिक किमतीमधील नरमी आणि कमी झालेली मागणी यामुळे आॅगस्टमध्ये पेट्रोलियम, अभियांत्रिकी, चमडा यासारख्या २३ प्रमुख क्षेत्रांत भारताची निर्यात घटली.वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, निर्यातीच्या ज्या ३० क्षेत्रांवर वाणिज्य मंत्रालय निगराणी ठेवते, त्यातील २३ क्षेत्रांची निर्यात घटली. निर्यातीची घसरण रोखण्यासाठी सरकारने त्वरित हस्तक्षेप करावा, अशी मागणी निर्यातीची आघाडीची संघटना ‘फियो’ने केली आहे.आॅगस्टमध्ये भारताची निर्यात २०.२६ टक्क्यांनी घटून २१.२६ अब्ज डॉलर झाली. या काळात व्यापार तूट वाढून १२.४७ अब्ज डॉलर झाली. फेडरेशन आॅफ इंडियन एक्स्पोर्ट आॅर्गनायझेशनचे (फियो) प्रमुख एस. सी. रल्हन म्हणाले की, या आव्हानात्मक परिस्थितीत निर्यातीचा आराखडा तयार करण्यासाठी निर्यात संघटना आणि प्रमुख निर्यातदार यांची बैठक घेणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी निश्चित केलेला निर्यातीचा आकडा गाठणेही कठीण बनले आहे. सध्याच्या स्थितीसाठी कमी मागणी, तेलांच्या घटत्या किमती आणि अन्य देशांतर्गत कारणे कारणीभूत आहेत.