Join us  

यंंदा भारतातील हिरे निर्यातीची अवस्था २००८ पेक्षाही वाईट; लॉकडाऊनचा बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 6:51 AM

Coronavirus Lockdown Effect: यंदाच्या वित्त वर्षात कट आणि पॉलिशड् हिऱ्यांची निर्यात २० ते २५ टक्क्यांनी घसरेल.

नवी दिल्ली : यंदा भारताची हिरे निर्यातीची स्थिती जागतिक मंदीचे वर्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २००८ पेक्षाही वाईट असल्याचे अधिकृत आकडेवारीतून समोर आले आहे. यंदा हिरे निर्यातीत तब्बल २५ टक्के घसरण होईल, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. कोविड-१९ महामारीमुळे हिरे व्यवसायातील पुरवठा साखळी पूर्णत: कोलमडून पडली आहे. त्यामुळे निर्यात मोठ्या प्रमाणात घसरल्याचे सूत्रांनी सांगितले.

जेम अ‍ॅण्ड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे चेअरमन कोलिन शाह यांनी सांगितले की, यंदाच्या वित्त वर्षात कट आणि पॉलिशड् हिऱ्यांची निर्यात २० ते २५ टक्क्यांनी घसरेल. सप्टेंबरला संपलेल्या पहिल्या सहा महिन्यांत हिºयांची निर्यात ३७ टक्क्यांनी घसरून ५.५ अब्ज डॉलरवर आली आहे. गेल्या वित्त वर्षात १८.६६ अब्ज डॉलरची निर्यात झाली होती.

शाह यांनी सांगितले की, यंदाची स्थिती २००८ पेक्षाही वाईट आहे. २००८मध्ये एका तिमाहीत मोठी घसरण झाली होती. नंतर मात्र व्यवसायात सुधारणा झाली होती. यंदाच्या वित्त वर्षातील दोन तिमाही संपल्या आहेत. तरीही परिस्थिती वाईटच आहे. येणाºया सहा महिन्यांच्या काळात दिवाळी, नाताळ, व्हॅलेण्टाइन्स डे आणि चांद्र नववर्ष असे सण-उत्सव आहेत. त्यामुळे मागणी वाढेल; पण संपूर्ण वर्षातील घसरण त्यामुळे भरून निघेल, असे वाटत नाही.लॉकडाऊनमुळे सर्वच झाले ठप्पभारत सरकारने मार्चमध्ये कठोर लॉकडाऊन लावले होते. त्यामुळे व्यावसायिक घडामोडी पूर्णत: ठप्प झाल्या. यंदा अर्थव्यवस्थेत चार शतकांत पहिल्यांदाच वार्षिक घसरण दिसण्याची शक्यता आहे. भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा सात दशलक्षांपेक्षा जास्त झालेला असून, जगातील ‘कोरोना हॉटस्पॉट’ म्हणून भारत ओळखला जात आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या