Join us

आॅस्ट्रेलियातील भारतीयांना फटका

By admin | Updated: November 18, 2016 03:49 IST

आॅस्ट्रेलियातील भारतीय नोकरदारांना बसणार आहे.

मेलबोर्न : आॅस्ट्रेलियाने आपल्या ‘४५७ व्हिसा’ कार्यक्रमात बदल केल्याची घोषणा केली आहे. नव्या बदलांत अधिकृत रोजगार संपल्यानंतर दुसरा रोजगार शोधण्याच्या संधी मर्यादित झाल्या असून, त्याचा फटका आॅस्ट्रेलियातील भारतीय नोकरदारांना बसणार आहे.एबीसी दिलेल्या माहितीनुसार, ४५७ व्हिसावर आॅस्ट्रेलियात आलेल्या विदेशी कामगारांना ४ वर्षे राहता येते. ज्या ठिकाणी आॅस्ट्रेलियाई कामगार मिळणार नाही, अशा ठिकाणी त्यांना काम करता येते. आपले अधिकृत काम संपल्यानंतर ९0 दिवसपर्यंत आॅस्ट्रेलियात राहण्याची मुभा विदेशी कामगारांना होती. नव्या नियमात ही सवलत ६0 दिवसांपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. याचाच अर्थ, विदेशी कामगारांसाठी नवे काम शोधण्याच्या संधी कमी करण्यात आल्या आहेत. (वृत्तसंस्था)