Join us  

भारतीय चित्रपट उद्योग होणार २३,८०० कोटींचा, समस्याही अनेक : लागतात तब्बल 70 परवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:54 AM

भारतीय चित्रपट उद्योगाचा वार्षिक आधारावरील वृद्धीदर ११ टक्के असून, २०२० सालापर्यंत तो २३,८०० कोटी रुपयांचा (३.७ अब्ज डॉलर) होईल. पीएचडी चेंबर आणि बीएनबी नेशन या संस्थांनी केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

मुंबई : भारतीय चित्रपट उद्योगाचा वार्षिक आधारावरील वृद्धीदर ११ टक्के असून, २०२० सालापर्यंत तो २३,८०० कोटी रुपयांचा (३.७ अब्ज डॉलर) होईल. पीएचडी चेंबर आणि बीएनबी नेशन या संस्थांनी केलेल्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.संस्थांच्या अहवालात म्हटले की, सध्या भारतीय चित्रपट उद्योग १३,८०० कोटी रुपयांचा (२.१ अब्ज डॉलर) महसूल कमावतो. गेल्या दोन वर्षांपासून त्याचा संयुक्त वार्षिक वृद्धीदर १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. चित्रपट उद्योगास नियामकीय पातळीवर अनेक समस्या भेडसावत आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी ७० मंजुºया आणि परवाने घ्यावे लागतात. त्यासाठी ३० सरकारी कार्यालयांत चकरा माराव्या लागतात.‘स्लमडॉग मिलेनिअर’ यासारख्या भारतावर आधारित चित्रपटांच्या यशानंतर भारत हा चित्रपटांच्या चित्रीकरणाचे उत्तम ठिकाण म्हणून लोकप्रिय होताना दिसत आहे. अनेक आंतरराष्टÑीय स्टुडिओ आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण करण्यासाठी भारताला प्राधान्य देत आहेत. विशेष म्हणजे चित्रपटाचा मोठा भाग ते भारतात चित्रित करून घेताना दिसून येते. अहवालातील माहितीनुसार, सेकंड बेस्ट एक्झॉटिक मारीगोल्ड हॉटेल, मिलियन डॉलर आर्म, द हंड्रेड फूट जर्नी, लाइफ आॅफ पाय, मिशन इम्पॉसिबल आयव्ही आणि जॉब्ज यांसारख्या अनेक हॉलिवूडपटांचे चित्रीकरण भारतात झाले. परवाने काढण्याच्या मार्गातील अडथळ्यांमुळे चार वर्षांत भारताने १८ मोठे चित्रपट गमावले. निर्माते भारताऐवजी अन्य देशांत जाताना दिसून येत आहेत. नियमन कमी केल्यास चित्रपट क्षेत्राची वृद्धी आणखी वेग घेईल.अहवालात म्हटले की, विदेशी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे. माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी परराष्टÑ व्यवहार मंत्रालयाची परवानगीही घ्यावी लागते.दरवर्षी २ हजार चित्रपट-अनेक अडचणी असल्या तरी चित्रपटांच्या संख्येच्या दृष्टीने भारतीय चित्रपटसृष्टी जगात पहिल्या स्थानावर आहे. भारतात दरवर्षी २० भाषांत १,५०० ते २,००० चित्रपटांची निर्मिती होते.महसुलाच्या बाबतीत मात्र भारतीय चित्रपट उद्योग अन्य देशांतील चित्रपट उद्योगांच्या तुलनेत अत्यंत छोटा आहे.भारतीय चित्रपटसृष्टीचा एकूण महसूल २.१ अब्ज डॉलर असताना अमेरिका आणि कॅनडाच्या चित्रपटसृष्टीचा महसूल ११ अब्ज डॉलर एवढा आहे. वास्तविक, तेथे वर्षाला फक्त ७०० चित्रपटनिर्माण होतात.हिंदी चित्रपट21%भारतात दरवर्षी जे चित्रपट प्रदर्शित होतात, त्यापैकी २१ टक्के हिंदीतील असतात. मल्याळम् व कानडी चित्रपटांचे प्रमाण आहे प्रत्येकी १0 टक्के, तर दरवर्षी प्रदर्शित होणाºया तमिळ व तेलगू चित्रपटांचे प्रमाण आहे प्रत्येकी २0 टक्के. दरवर्षी ३ टक्के मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. बंगाली चित्रपटांचे तुलनेने अधिक म्हणजे ८ टक्के आहे.ओरिया चित्रपटांची फारशी कोणाला माहिती नसली तरी दरवर्षी त्या भाषेतील दोन टक्के प्रदर्शित होतात. म्हणजेच आठ भाषांत मिळून दरवर्षी ९५ टक्के चित्रपट तयार होऊ न लोकांना पाहायला मिळतात. उरलेल्या पाच टक्क्यांमध्ये आसामी, राजस्थानी, मणिपुरी, गुजराती, पंजाबी, भोजपुरी आदी भाषांतील चित्रपटांचा समावेश आहे.

टॅग्स :सिनेमा