Join us

चिनी कंपन्याना भारताचे आवाहन

By admin | Updated: November 27, 2014 01:40 IST

चिनी कंपन्यानी भारतात गुंतवणूक करावी असे आवाहन भारत सरकारने केले आहे. यामुळे दोन्ही देशातील व्यापारात भारताला होणारा तुटवडा कमी होऊ शकेल.

नवी दिल्ली : चिनी कंपन्यानी भारतात गुंतवणूक करावी असे आवाहन भारत सरकारने केले आहे. यामुळे दोन्ही देशातील व्यापारात भारताला होणारा तुटवडा कमी होऊ शकेल. भारत-चीन व्यापारात भारताला होणारी तूट 2क्13-14 साली 36 अब्ज डॉलर्पयत पोहोचली आहे. औद्योगिक धोरण व संवर्धन विभागाचे सचिव अमिताभ कांत यांनी या तोटय़ाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 
व्यापारातील हे असंतुलन दीर्घकाळ सहन करणो शक्य नाही, त्यामुळे चिनी कंपन्यानी भारतात गुंतवणूक करुन कारखाने येथे सुरु केले तरच पुढे व्यापार करणो शक्य होईल . भारत व चीन यांच्यातील व्यापार 2क्13-14 साली 65.85 अब्ज डॉलरचा होता. भारताची चीनकडून  आयात 51.क्3 अब्ज डॉलर असून, निर्यात 14.82 अब्ज डॉलर 
आहे.