संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालानुसार भारताचा आर्थिक विकास चीनला मागे सारेल आणि २०१७ मध्ये भारताचे सकल देशी उत्पादन (जीडीपी) ७.७ टक्के असण्याची शक्यता आहे. ही शक्यता मंगळवारी संयुक्त राष्ट्राच्या ‘जागतिक आर्थिक स्थिती तथा शक्यता’ या मथळ्याच्या अर्धवार्षिक अहवालात नमूद करण्यात आली आहे. भारताची अर्थव्यवस्था यावर्षी ७.६ टक्के दराने वाढण्याची शक्यता असून, हा वेग २०१६ मध्ये ७.७ टक्के असण्याचा व पर्यायाने भारत चीनला मागे सारण्याची शक्यता आहे.चीनचा विकास दर २०१५ मध्ये ७ टक्के व २०१६ मध्ये ६.८ टक्के असण्याचा अंदाज आहे. अहवालात दक्षिण आशियाची आर्थिक परिस्थिती बऱ्याच हद्दीपर्यंत विकासाला अनुकूल असल्याचे म्हटले आहे. या अंदाजानुसार जास्तीत जास्त अर्थव्यवस्थांचा विकास २०१५-२०१६ मध्ये बळकट होण्याची शक्यता आहे व हा विकास घरगुती उपयोगाच्या वस्तुंचे उत्पादन, गुंतवणूक आणि निर्यात वाढीमुळे होईल, असे अहवालात म्हटले आहे.बोइंगची बांधणी... अमेरिकेच्या वॉशिंग्टन शहरातील रेनटन येथील कारखान्यात जगप्रसिद्ध ७३७ बोइंग विमानाची बांधणी सुरू असतानाचे छायाचित्र. यंदा ७५0 ते ७५५ व्यावसायिक बोइंग विमाने विकले जातील, अशी कंपनीची अपेक्षा आहे. त्यातून कंपनीला तब्बल ६५.५ अब्ज डॉलरची मिळकत होणार आहे.
भारत वाढीच्या बाबतीत चीनला मागे टाकणार
By admin | Updated: May 21, 2015 00:31 IST