Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत टॉप टेन बाजारात

By admin | Updated: May 30, 2014 03:39 IST

आंतरराष्ट्रीय समुदायाशी होणार्‍या व्यवहारांमध्ये वाढ झाल्यामुळे भारत जगातील अव्वल दहा देशांमध्ये सामील झाला आहे.

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय समुदायाशी होणार्‍या व्यवहारांमध्ये वाढ झाल्यामुळे भारत जगातील अव्वल दहा देशांमध्ये सामील झाला आहे. आगामी काळासाठी भारत हा तिसर्‍या क्रमांकाचा महत्त्वाचा देश असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. आॅस्ट्रेलियन उद्योगांची संघटना असलेल्या एआयबीएसने आंतरराष्टÑीय पातळीवर केलेल्या व्यवहारांबाबत केलेल्या एका पाहणीतून निघालेल्या निष्कर्षांनुसार भारताने या यादीमध्ये नववे स्थान पटकावले आहे. आंतरराष्टÑीय व्यवहारांमध्ये आगामी काळात भारत हा तिसर्‍या क्रमांकाचा देश राहण्याचा अंदाजही यामधून व्यक्त झाला आहे. आंतरराष्टÑीय व्यवहारांमध्ये मिळालेल्या उत्पन्नाच्या आधारावर करण्यात आलेल्या या यादीत अमेरिका अव्वल स्थानावर असून चीनचा दुसरा क्रमांक लागला आहे. भारताचा यादीत नववा क्रमांक लागला आहे. आंतरराष्टÑीय स्तरावर काम करताना कंपन्यांना विविध देशांच्या भाषा, संस्कृती यांचा अभ्यास करावा लागतो. त्याचप्रमाणे त्या देशातील कायद्यांचीही माहिती करून घ्यावी लागत असल्याचे कंपन्यांतर्फे सांगण्यात आले. यामुळे व्यवहारांवर निर्बंध येत असतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी आर्थिक वृद्धी दर ५ ते ५.५० टक्के राहील, असा अंदाज बर्‍याच रेटिंग एजन्सीने व्यक्त केला आहे. त्यात आंतरराष्टÑीय व्यवहारात भारताने नव्या स्थानी झेप घेतली. हे चांगले संकेत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)