जिनेव्हा : २०२० पर्यंत भारत जगातील तिसरे मोठे कारचे मार्केट असेल, असे मत सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने व्यक्त केले आहे. भारतीय बाजारपेठेच्या वृद्धीत मोठी भूमिका निभावण्यासाठी तयार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. भारतातील कार बाजारात मारुती सुझुकी इंडियाचा वाटा ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. कंपनीने २०२० पर्यंत आपले उत्पादन २० लाख कार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानुसार गुजरातमधील प्रकल्पाचे काम सुरु केले आहे. सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे कार्यकारी महाव्यवस्था‘पक किन्जी साइतो यांनी जिनेव्हा मोटर शोच्या वेळी सांगितले की, भारत जगातील तिसरा मोठा कारचा बाजार बनत आहे. (वृत्तसंस्था)
२०२० पर्यंत भारत तिसरे मोठे कार मार्केट
By admin | Updated: March 13, 2017 00:32 IST