Join us

पीतांबरी कंपनीला इंडिया एसएमई पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 00:48 IST

जगातील ४४ देशांतील १७५ प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

मुंबई : लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे ‘इंडिया एसएमई १00’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. अतिशय मानाचा ओळखला जाणारा हा पुरस्कार यंदा पीतांबरी प्रॉडक्टस् प्रा. लिमिटेड या कंपनीला देण्यात आला.दिल्लीत झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार पीतांबरीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक परीक्षित प्रभुदेसाई यांनी स्वीकारला. जगातील ४४ देशांतील १७५ प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या पुरस्कारासाठी देशातील ३४ हजार कंपन्यांनी आपली माहिती पाठवली होती. त्यातून १00 कंपन्यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्रातून २३ कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :व्यवसाय