Join us

‘भारत कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यास तयार’

By admin | Updated: September 15, 2015 03:44 IST

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात फेरबदल केल्यास उद्भवणाऱ्या स्थितीचा मुकाबला करण्यास सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक तयार असून यात जरूर यशस्वी होऊ, असा विश्वास

नवी दिल्ली : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात फेरबदल केल्यास उद्भवणाऱ्या स्थितीचा मुकाबला करण्यास सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक तयार असून यात जरूर यशस्वी होऊ, असा विश्वास वित्त मंत्रालयाने व्यक्त केला आहे.१७ सप्टेंबर रोजी फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढविण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षापासून फेडरल रिझर्व्ह पतधोरणाबाबत विचार करीत आहे. कोणत्याही वेळी फेडरल रिझर्व्ह निर्णय घेऊ शकते, याची कल्पना आहे. रोजगाराच्या आकडेवारीमुळे फेडरल रिझर्व्ह व्याजदरवाढीचा निर्णय टाळत आली आहे. तथापि, अमेरिकन प्रशासन अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही, याबाबत पूर्ण विचाराअंतीच पावले उचलील, असे आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव शक्तिकांत दास यांनी सांगितले.फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढविल्यास भारतासह अन्य उदयोन्मुख बाजारांतून भांडवल काढले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दास यांनी स्पष्ट केले की, भारताची परकीय गंगाजळीची स्थिती समाधानकारक आहे.