Join us  

LIC IPO Issue Price: ९४९ रुपये, एलआयसीनं निश्चित केली आयपीओची इश्यू प्राईज, १७ मे रोजी होणार लिस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2022 1:10 PM

Lic IPO Issue Price : भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठा आयपीओ आणणारी सरकारी कंपनी एलआयसीनं आपल्या आयपीओची इश्यू प्राईज निश्चित केली आहे.

LIC IPO News: भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठा आयपीओ आणणारी सरकारी कंपनी एलआयसीनं आपल्या आयपीओची इश्यू प्राईज निश्चित केली आहे. कंपनीनं ९४९ रुपयांची इश्यू प्राईज ठरवली असून हा त्याचा अपर बँड आहे. कंपनीनं आपल्या आयपीओसाठी प्राईज बँड ९०२ ते ९४९ रुपये ठेवला होता.

एलआयसीच्या आयपीओचं अलॉटमेंट पूर्ण झालं असून आता कंपनी शेअर बाजारात केव्हा लिस्ट होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, ज्यांना शेअर्स अलॉट झाले आहेत त्यांच्या डिमॅट खात्यात १६ मे पर्यंत हे शेअर जमा केले जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर ज्यांना अलॉट झालेले नाही किंवा कमी शेअर्स अलॉट झाले आहेत, त्यांच्या खात्यात १६ मे पर्यंत रक्कम जमा होणार.

९ मे रोजी बंद झाला आयपीओएलआयसीचा आयपीओ ४ ते ९ मे या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. LIC IPO चा प्राईज बँड ९०२ ते ९४९ रुपये निश्चित करण्यात आली होता. या आयपीओद्वारे २०,५५७ कोटी रुपये जमवण्यात आले आहेत. एलआयसीचा आयपीओ तीन पटींपेक्षाही कमी सबस्क्राईब झाला असून तो अपेक्षेपेक्षा कमी असल्याचं म्हटलं जात आहे. महागाई, युक्रेन-रशिया यांच्यातील युद्ध आणि भारतीय बाजारपेठेतील विदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री यामुळे शेअर बाजारात सध्या घसरण सुरू आहे. 

GMP घसरलाएलआयसी आयपीओमध्येगुंतवणूक करणाऱ्यांना झटका लागण्याची शक्यता आहे. एलआयसीचा शेअर स्टॉक मार्केटवर लिस्टिंगपूर्वीच ग्रे मार्केट प्रीमिअम सातत्यातनं घसरत आहे. एलआयसी आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमिअम आपल्या इश्यू प्राईजच्या अपर बँडपेक्षा २५ रुपये कमीनं ट्रेड करत आहे.

टॅग्स :एलआयसी आयपीओशेअर बाजारगुंतवणूक