- वैशाली मलेवार, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ या पुढाकाराला लक्झरी कारच्या उद्योगाकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या कंपन्यांनी भारतात जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे वाहनांच्या किमती कमी होतील. जाणकारांच्या मते येत्या काही वर्षांत भारत गाड्यांची आशियातील सगळ्यात मोठी बाजारपेठ बनेल. मर्सिडीज बेंझ, आॅडी आणि बीएमडब्ल्यूसारख्या लक्झरी गाड्यांच्या कंपन्या गाड्यांच्या निर्मितीसाठी भारताला प्रथम पसंती देत आहेत. लक्झरी गाड्यांमध्ये क्रमांक एकवर असलेल्या मर्सिडीज बेंझने गुरुवारी आपली तीन नवी मॉडेल्स एस ५०० कुपे, एस ६३ एएमजी कुपे आणि एसयुजी जी ६३ एएमजी लाँच केली. त्यांची एक्स फॅक्ट्री किंमत अनुक्रमे २ कोटी, २.१७ कोटी आणि २.६० कोटी रुपये आहे. मर्सिडीज बेंझचे मुख्य कार्यकारी अधिकारी एबरहार्ड कर्न यांनी सांगितले की त्यांनी आपल्या ६ मॉडेल्सचे भारतात उत्पादन सुरू केले आहे. लवकरच सातव्या मॉडेलचेही उत्पादन सुरू होईल. मर्सिडीजने एकूण उत्पादनाच्या ६० टक्के उत्पादन भारतात करायला सुरुवात केली आहे. स्थानिक उत्पादन असल्यामुळे गाड्यांच्या किमतीत सुमारे २ लाख रुपयांची घट झालेली आहे.बीएमडब्ल्यूनेही भारतातील आपले उत्पादन वाढविले आहे. यासाठी त्यांनी चेन्नईच्या त्यांच्या प्लांटमध्ये भारतात विकल्या जाणाऱ्या गाड्यांचे ५० टक्के स्पेअर पार्टस्चे उत्पादन करायला सुरुवात केली आहे. काही महिन्यांआधीपर्यंत कंपनी फक्त २० ते ३० टक्केच स्पेअर पार्टस् भारतात तयार करायची. यामुळे बीएमडब्ल्यूच्या किमतीदेखील कमी होताना दिसतात.सध्या बीएमडब्ल्यूने त्यांच्या आठ गाड्यांची निर्मिती करायला सुरुवात केली आहे; मात्र या कंपन्यांचे म्हणणे हे आहे की, येथे १०० टक्के उत्पादन केले जावे एवढा भारतात लक्झरी बाजार मोठा नाही. २००७ नंतर या बाजारात ८ टक्क्यांची वाढ झालेली आहे.
‘मेक इन इंडिया’ला लक्झरी कार उद्योगाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Updated: August 1, 2015 01:53 IST