Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारत पूर्वीपेक्षा सध्या अधिक मजबूत स्थितीत

By admin | Updated: August 30, 2016 04:48 IST

देशाची अर्थव्यवस्था आज मजबूत स्थितीत आहे. भारत आजच्यासारखा मजबूत स्थितीत कधीही नव्हता, असे मत एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई : देशाची अर्थव्यवस्था आज मजबूत स्थितीत आहे. भारत आजच्यासारखा मजबूत स्थितीत कधीही नव्हता, असे मत एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी व्यक्त केले आहे. सीआयआयकडून आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. दीपक पारेख म्हणाले की, देशाच्या विकासाच्या शक्यता दृष्टिपथात आहेत. यासाठी आवश्यक सुधारणांचे सहकार्यही याला मिळत आहे. सध्याच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. जीडीपीचा वृद्धी दर ७.५ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे भारत आज जगात अन्य देशांच्या तुलनेत मजबूत स्थितीत आहे. पारेख म्हणाले की, कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने याचा फायदा भारताला झाला आहे. (प्रतिनिधी)