Join us

भारत वेगाने विकसित होणारी महाशक्ती, चीनला टाकले मागे, अहवाल

By admin | Updated: July 9, 2017 14:48 IST

सिक्कीममधील सीमाप्रश्नावरून भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण असतानाच चीनला धक्का देणारी एक बातमी आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - सिक्कीममधील सीमाप्रश्नावरून भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण असतानाच चीनला धक्का देणारी एक बातमी आली आहे. आर्थिक क्षेत्रात भारत हा चीनला मागे टाकून जागतिक महाशक्ती म्हणून उदयास येत आहे. तसेच पुढच्या काही दशकांमध्येही भारत चीनवरील आपली आघाडी कायम राखणार असल्याचे हॉवर्ड विद्यापीठाने केलेल्या अध्ययनात समोर आले आहे. 
हॉवर्ड विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने प्रसिद्ध केलेल्या विकास अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. या अहवालानुसार वेगाने विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये 2025 पर्यंत भारत हा आघाडीवर असेल.   तसेच भारताचा वार्षिक विकास दर 7.7 टक्के एवढा राहील. गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक आर्थिक वाढीचे केंद्र चीनकडून भारताकडे सरकले आहे. तसेच पुढील दहशकामध्येही हे चित्र कायम राहण्याची शक्यता आहे.   
 गेल्या काही काळात भारताच्या निर्यातीमध्ये वैविध्य आले आहे. रसायन, वाहने आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातून भारताची निर्यात होत आहे, याकडेही या अहवालातून लक्ष वेधण्यात आले आहे.   हॉवर्ड विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने प्रसिद्ध केलेला हा अंदाज प्रत्येक देशाची आर्थिक गुंतागुंत, निर्यातीमधील उत्पादन क्षमतेतील विविधता यांचा अभ्यास करून व्यक्त केला आहे.