नवी दिल्ली : एप्रिल महिन्यातील कारखाना आणि सेवा क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करीत भारताने चीनवर मात केली. तथापि, या अवधीत उदयोन्मुख बाजारपेठ असलेल्या देशांत आर्थिक वृद्धीची गती मंदावल्याचे एचएसबीसीने म्हटले आहे.एचएसबीसी उदयोन्मुख बाजारपेठ निर्देशांक एप्रिलमध्ये खालावला. मार्चमध्ये हा निर्देशांक ५१.५ होता. एप्रिलमध्ये तो ५१.३ वर आला. मार्चमधील ही आकडेवारील जानेवारीनंतरची सर्वांत चांगली आकडेवारी होती. यावर्षी दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीपासून उदयोन्मुख बाजारपेठांनी जागतिक आर्थिक वृद्धीला आडकाठी घालण्याचे काम केले. चार मोठ्या उदयोन्मुख बाजारांपैकी चीनचा वृद्धीदर जानेवारीनंतर सर्वांत कमी राहिला, तर भारतातील खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या कामगिरीचा आलेख सलग १२ महिन्यांपासून चढता राहत आला आहे. तथापि, आॅक्टोबरमध्ये वृद्धीदर घसरला होता, असे मार्किटचे मुख्य अर्थतज्ज्ञ क्रिस विल्यमसन यांनी सांगितले.एकूणच संपूर्ण आशियात अस्वस्थता दिसते. चीन आणि भारताच्या आर्थिक वृद्धीची गती मंदावलेली असताना एप्रिलमध्ये ती आणखी धीमी पडली. आशियात अशी स्थिती असतानाही भारत मात्र आकर्षक स्थान टिकवून आहे, असे एचएसबीसीने म्हटले आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)
भारताची चीनवर मात
By admin | Updated: May 9, 2015 00:33 IST