Join us
Daily Top 2Weekly Top 5

या महिन्यापासून मिळणार वाढीव भत्ते

By admin | Updated: July 4, 2017 00:36 IST

सुमारे ४८ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना या महिन्यापासून (जुलै २0१७) वाढीव घरभाडे भत्ता मिळणार आहे. ही वाढ १0६ टक्के ते १५७ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सुमारे ४८ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना या महिन्यापासून (जुलै २0१७) वाढीव घरभाडे भत्ता मिळणार आहे. ही वाढ १0६ टक्के ते १५७ टक्के असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ७ व्या वेतन आयोगाशी संबंधित सुधारित वाढीव भत्त्यांना मंजुरी दिली आहे. त्याची अंमलबजावणी या महिन्यापासून सुरू होणार आहे. जून २0१६ मध्ये मंत्रिमंडळाने आयोगाने सूचविलेल्या विविध भत्त्यांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली होती. समितीने काही सुधारणा सूचविल्या होत्या. सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या एक्स दर्जाच्या शहरांसाठी (५0 लाख आणि त्यापेक्षा जास्त लोकसंख्या) ३0 टक्के, वाय दर्जाच्या शहरांसाठी (५ ते ५0 लाख लोकसंख्या) २0 टक्के, झेड दर्जाच्या शहरांसाठी (५ लाखांपेक्षा कमी लोकसंख्या) १0 टक्के घरभाडे भत्ता दिला जातो. सातव्या वेतन आयोगाने एक्स शहरांसाठी २४ टक्के, वायसाठी १६ टक्के आणि झेडसाठी ८ टक्के कपात सूचविली होती. तथापि, कपात करण्यात आलेले दर कनिष्ठ गटातील कर्मचाऱ्यांसाठी पुरेसे नाहीत, असे आढळून आल्यानंतर एक्स, वाय आणि झेड दर्जाच्या शहरांसाठीचा घरभाडे भत्ता अनुक्रमे ५,४00 रुपये, ३,६00 रुपये आणि १,८00 रुपयांपेक्षा कमी नसावा, असा निर्णय झाला होता. त्यानुसार १८ हजार रुपये किमान वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ३0 टक्के, २0 टक्के आणि १0 टक्के फ्लोअर रेट ठरविण्यात आला होता. १ ते ३ या पातळीवरील ७.५ लाख कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होईल. ए. के माथूर यांच्या नेतृत्वाखालील भत्ते समितीच्या शिफारशी सरकारने स्वीकारल्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता मिळेल.