Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोकऱ्या बदलण्याचे प्रमाण वाढणार!

By admin | Updated: June 12, 2015 00:20 IST

रोजगार अर्थात नोकरीच्या अनेक संधी निर्माण झाल्यामुळे येत्या एक वर्षात कर्मचारी नोकऱ्या बदलण्याची शक्यता जास्त आहे.

मुंबई : रोजगार अर्थात नोकरीच्या अनेक संधी निर्माण झाल्यामुळे येत्या एक वर्षात कर्मचारी नोकऱ्या बदलण्याची शक्यता जास्त आहे. मायकेल पेज इंडियाच्या कर्मचारी आकांक्षा सर्वेक्षण २०१५ मध्ये सहभागी झालेल्या ७३ टक्के उत्तरदात्यांनी आम्ही गेल्या १२ महिन्यांत मुलाखती दिल्याचे सांगितले. ८२ टक्क्यांनी आम्ही येत्या १२ महिन्यांत नोकरी बदलू शकतो, असे म्हटले. कर्मचाऱ्यांच्या नोकरी सोडून जाण्याच्या वेगामुळे त्यांच्या इच्छा-आकांक्षा वाढल्या आहेत व बहुतेक कर्मचाऱ्यांची भूमिका बदलण्याची तयारी आहे, असे दिसते. बहुतेक भारतीय कर्मचारी जास्त वेळ काम करतात. ३४ टक्क्यांनी आम्ही आठवड्याचे ५१ तास काम करतो, असे सांगितले. भारताच्या अनेक कर्मचाऱ्यांमध्ये खूप गुणवत्ता आहे. सध्या बाजारपेठ महत्त्वाच्या अशा टप्प्यावर उभी असल्यामुळे कंपन्या आपल्या कार्यक्षम कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडून जाऊ नये यासाठी धोरण आखताना वस्तुस्थितीचाही विचार करतील. भारतीय कंपन्या विविधतेचा कार्यक्रम पुढे नेण्यात कमी पडल्या आहेत. कारण ४२ टक्के उत्तरदात्यांनी आम्हाला आमच्या कंपनीच्या विविधतेच्या नीतीबद्दल माहिती नाही, असे सांगितले.