मुंबई : नेपाळमधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी निधी संकलन करतानाच देणगी देणाऱ्यांना करामध्ये सूट देण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या परगानग्या तातडीने देण्यात येणार असल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जाहीर केले आहे. याकरिता प्राप्तिकर विभागाने देशपातळीवर ‘तात्काळ’ व्यवस्था सुरू केली आहे. नैसर्गिक आपत्ती अथवा विशिष्ट देणगी गोळा करायची असल्यास त्यासंदर्भात प्राप्तिकर खात्याची परवानगी अनिवार्य असते. यासह ज्यांना याकरिता देणगी द्यायची असते, त्यांना जेवढी रक्कम देणगीच्या रुपात दिली जाते, त्यात प्राप्तिकरात १०० टक्के वजावट मिळते.
नेपाळ मदतनिधीसाठी मिळणार आयकर सूट
By admin | Updated: May 1, 2015 23:26 IST