Join us  

Income Tax Return: इन्कम टॅक्स भरण्यासाठी मिळू लागला फॉर्म, ऑनलाइन भरू शकता; तुमच्यासाठी कोणता फॉर्म?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 1:33 PM

१ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं. यासोबतच एप्रिल महिन्यात आयकर विभागानं करदात्यांसाठी एक मोठी अपडेट जारी केली आहे. विभागानं कर भरण्यासाठी ऑनलाइन फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत.

Income Tax Return: १ एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालं. यासोबतच एप्रिल महिन्यात आयकर विभागानं करदात्यांसाठी एक मोठी अपडेट जारी केली आहे. विभागानं कर भरण्यासाठी ऑनलाइन फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत. याचा अर्थ आता करदात्यांना त्यांची इच्छा असल्यास त्यांचा इन्कम टॅक्स रिटर्न भरता येईल. विभागाने आर्थिक वर्ष २०२३-२४ (AY 2024-25) साठी ITR-1, ITR-2, आणि ITR-4 फॉर्म जारी केले आहेत. हे सर्व फॉर्म व्यक्ती, व्यावसायिक आणि लहान व्यावसायिकांसाठी आहेत. आता सर्व करदाते हे फॉर्म भरण्यास पात्र आहेत. ते त्यांचा इन्कम टॅक्स रिटर्न भरू शकतात. 

इन्कम टॅक्स रिटर्न भरताना तो अत्यंत काळजीपूर्वक भरणं आवश्यक आहे. यासाठी अनेकजण प्रोफेशनल्सची मदत घेतात. तर स्वतःहून आयटीआर भरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. जर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न स्वतः भरायचा असेल तर पहिला प्रश्न हा आहे की तुम्ही कोणता फॉर्म भराल. 

कोणता ITR Form भरावा? 

इन्कम टॅक्स रिटर्नसाठी अनेक प्रकारचे फॉर्म आहेत. जर तुम्ही चुकीच्या फॉर्मसह इन्कम टॅक्स रिटर्न भरला असेल तर विभाग ते चुकीचं ठरवून नाकारू शकतो. 

ITR-1 

तुमचं उत्पन्न ५० लाखांपर्यंत असल्यास तुम्ही हा फॉर्म निवडू शकता. उत्पन्नाचा स्रोत पगार, कौटुंबिक पेन्शन, निवासी मालमत्ता यातून असला पाहिजे. शेतीतून मिळणारं उत्पन्न ५ हजार रुपयांपर्यंत असलं तरीही ITR-1 दाखल करता येतो. तुम्ही एखाद्या कंपनीत संचालक असाल किंवा अनलिस्टेड कंपनीत तुमचे शेअर्स असल्यास, तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही. पगारदार व्यक्तींना त्यांच्या कंपनीकडून फॉर्म-१६ मिळाल्यानंतरच आयकर रिटर्न भरता येतो. 

ITR-2 

ज्यांची कमाई ५० लाखांपेक्षा जास्त आहे. ते हा फॉर्म भरू शकतात. यामध्ये एकापेक्षा जास्त निवासी मालमत्ता, गुंतवणुकीवर झालेला भांडवली नफा किंवा तोटा, १० लाख रुपयांपेक्षा जास्त डिविडंड आणि ५ हजार रुपयांपेक्षा जास्त शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती द्यावी लागते. भविष्य निर्वाह निधीचे व्याज मिळत असलं तरी हाच फॉर्म भरावा लागतो. 

ITR-3 

जर तुम्ही कोणत्याही व्यवसायातून नफा मिळवत असाल तर तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल. यामध्ये आयटीआर-१ आणि आयटीआर-२ मध्ये दिलेल्या सर्व उत्पन्नाची माहिती द्यावी लागेल. शेअर्स किंवा मालमत्तेच्या विक्रीतून भांडवली नफा आणि व्याज किंवा डिविडंडमधून नफा झाल्यास हाच फॉर्म भरावा लागेल. 

ITR-4 

हा फॉर्म सुगम या नावानंही ओळखला जातो. हा फॉर्म ५० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कंपन्यांसाठी आहे. ज्यांना 44 AD, 44 ADA किंवा 44AE सारख्या कलमांतर्गत उत्पन्न मिळत आहे.

टॅग्स :इन्कम टॅक्स