Join us  

ITR फाइल केल्यानंतरही अद्याप मिळाला नाही रिफंड? या चुकांमुळे होऊ शकतो उशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 5:16 PM

Income Tax Refund : सोशल मीडियावर अनेक टॅक्सपेयर्सचे म्हणणे आहे की, आयटीआर फाइल करूनही 4 ते 5 महिन्यात रिफंड मिळाला नाही. 

ठळक मुद्देडिसेंबरमध्ये काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले होते की, टॅक्सपेयर्सना आयटीआर भरल्याच्या एका आठवड्यात रिफंड मिळतो.

नवी दिल्ली : 1 एप्रिल 2020 पासून 11 जानेवारी 2021 दरम्यान 1.57 कोटी टॅक्सपेयर्सना 1,73,139 कोटी  रुपयांचा रिफंड (Income Tax Refund) जारी करण्यात आला आहे. 1,54,55,577 प्रकरणात 57,139 कोटी रुपयांचा रिफंड जारी करण्यात आला आहे. तर 2,10,150 प्रकरणात 1,15,999 रुपयाचा कॉर्पोरेट टॅक्स (Corporate Tax) जारी करण्यात आला आहे, असे ट्विट करून केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने माहिती दिली आहे. मात्र, सोशल मीडियावर अनेक टॅक्सपेयर्सचे म्हणणे आहे की, आयटीआर फाइल करूनही 4 ते 5 महिन्यात रिफंड मिळाला नाही. 

डिसेंबरमध्ये काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले होते की, टॅक्सपेयर्सना आयटीआर भरल्याच्या एका आठवड्यात रिफंड मिळतो. प्राप्तिकर रिफंडची प्रक्रिया पूर्वीपेक्षा वेगवान होत आहे. त्यामुळे आयटीआर भरल्याच्या एका आठवड्यात रिफंड मिळत असल्याचे सांगण्यात आले होते. तर काही चार्टर्ड अकाउंटंट्सचे असे म्हणणे आहे की, काही प्रकरणात करदात्यांना लवकरच रिफंड मिळतो आहे. याआधी असे पाहायला मिळत नव्हते. ITR-1 आणि ITR-4 च्या प्रकरणात असे होत आहे. 

दरम्यान, प्राप्तिकर विभागाने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन तंत्रज्ञान CPC 2.0 चा  वापर करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय "झटपट प्रोसेसिंग" या नावाने प्राप्तिकर विभागाने एक नवा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत  ITR-1 आणि ITR-4 ची प्रोसेसिंग सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही आयटीआर  भरल्यानंतर तुमचा रिफंड मिळाला नसेल तर याची अनेक कारणे असू शकतात. त्याबद्दल जाणून घेऊया...

बँक अकाउंटबाबत चुकीची माहिती - प्राप्तिकर विभागाने सुरू केलेल्या नवीन प्रक्रियेअंतर्गत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आयटीआर रिफंड दिला जात आहे. म्हणजेच रिफंड रक्कम थेट टॅक्सपेयर्सच्या बँक अकाउंटमध्ये पाठविली जात आहे. अशा परिस्थितीत फॉर्ममध्ये असलेल्या बँक खात्याशी संबंधित माहिती चुकीची असल्यास परतावा मिळण्यास विलंब होऊ शकतो. ते दुरुस्त करेपर्यंत परतावा उपलब्ध होणार नाही. प्राप्तिकर पोर्टलवर जाऊन बँक अकाउंटची माहिती दुरुस्त केली जाऊ शकते. याशिवाय, तुमचे बँक अकाउंट तुमच्या पॅन कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे.

बँक अकाउंट व्हॅलिडेशन : रिफंड मिळविण्यासाठी, बँक अकाउंट व्हॅलिडेट करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटवर जाऊन पॅन आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा. यानंतर तुम्हाला 'प्रिव्हॅलिडेट युअर बँक अकाउंट' हा पर्याय निवडा. जर तुमचे बँक खाते ई-फाईलिंग पोर्टलसह इंटीग्रेटेड केले असेल तर इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोड म्हणजे ईव्हीसीद्वारे प्रिव्हॅलिडेशन थेट केले जाईल. तुम्हाला बँक खाते, आयएफएससी कोड, मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी द्यावा लागेल.

आयटीआर व्हेरिफाय नाही: तुम्ही आयटीआर व्हेरिफाय केल्यानंतरच प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. असे न केल्यास आयटीआर प्रक्रिया केली जाणार नाही आणि आपल्याला रिफंड मिळण्यास विलंब होईल. 

टॅग्स :करव्यवसायइन्कम टॅक्स