नवी दिल्ली : आयकर विभागाने तांत्रिक सतर्कता वाढविण्याबरोबरच जयपूर, सुरत आणि लखनौ यासारख्या दुसऱ्या श्रेणीच्या शहरांवर विशेष लक्ष देऊन अधिकाधिक लोकांना आयकराच्या कक्षेत आणण्याची तयारी केली आहे. यासाठी विशेष योजना आयकर विभागाने हाती घेतली आहे. पुढील महिन्यात ही योजना कार्यान्वित होणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाला सरकारने सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही योजना हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक महिन्यात कमीत कमी २५ लाख लोकांना करांच्या कक्षेत आणण्याचे निर्देश सरकारने कर बोर्डाला दिले आहेत. नव्या शहरांत विस्तार करताना सध्याची व्यवस्था कायम ठेवली जाईल.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}