Join us

‘आयकर’ने शोधली २०० कोटींची संपत्ती

By admin | Updated: December 19, 2014 04:13 IST

दोन औद्योगिक कंपन्यांची चौकशी केली असता आयकर विभागाला त्यांच्याकडे १००-१०० कोटी रुपयांहून अधिकच्या बेहिशेबी मालमत्तेचे पुरावे सापडले आहेत.

इंदूर : दोन औद्योगिक कंपन्यांची चौकशी केली असता आयकर विभागाला त्यांच्याकडे १००-१०० कोटी रुपयांहून अधिकच्या बेहिशेबी मालमत्तेचे पुरावे सापडले आहेत. दोन्ही कंपन्यांच्या इंदूर व मुंबई येथील कार्यालयांची आयकरने चौकशी केली.आयकर विभागाच्या चौकशी पथकाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या पाच दिवसांत पथकाने एक औषध उत्पादक कंपनी आणि अन्य एका औद्योगिक समूहाच्या इंदूर व मुंबई येथील कार्यालयाचे सर्वेक्षण केले. यावेळी दोन्ही कंपन्यांच्या हिशेबपत्रांची तपासणी करण्यात आली.आयकर सर्वेक्षणादरम्यान, दोन्ही कंपन्यांकडे १००-१०० कोटी रुपयांहून अधिकच्या बेहिशेबी मालमत्तेचे पुरावे सापडले. तथापि, दोन्ही कंपन्यांची अजून आयकर विभाग सखोल चौकशी करत आहे. या कंपन्यांकडे किती बेहिशेबी मालमत्ता आहे याबाबतचा विशिष्ट आकडा अद्याप समोर आला नाही, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.‘गेल्या काही वर्षात इंदूरच्या औद्योगिक कंपन्यांची उलाढाल वाढते तेव्हा त्या आपले नोंदणीकृत कार्यालय येथून मुंबई वा अन्य मोठ्या शहरांत हलवितात, असे दिसून आले आहे. अशा कंपन्यांकडून योग्य प्राप्तिकर वसूल व्हावा म्हणून आयकर विभागाचे इंदोर येथील पथक मुंबई व अन्य शहरांच्या विभागीय कार्यालयांना अशा प्रकरणांची ताबडतोब माहिती पाठवत आहे,’ अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली. (वृत्तसंस्था)