Join us

वाणिज्य - सामकी माता पतसंस्थेचे उद्घाटन आज

By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST

नागपूर : नव्याने स्थापन झालेल्या सामकी माता महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाचे २१ मार्च रोजी दुपारी १ वाजता महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. सक्करदऱ्यातील भोसलेनगरस्थित महाराजा व्यापार संकुल येथे पतसंस्थेचे कार्यालय स्थापन करण्यात आले.

महापौर प्रवीण दटके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर, आमदार सुधाकर कोहळे, विभागीय सहनिबंधक संजय कदम, जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले, पतसंस्थेचे संस्थापक प्रा. मोहन चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. संस्थेच्या अध्यक्षा कीर्ती चव्हाण, उपाध्यक्षा संध्या चव्हाण, सचिव निता पवार, कोषाध्यक्षा जयश्री राठोड आदीही उपस्थित राहतील.