Join us
Daily Top 2Weekly Top 5

कच्च्या तेलाच्या किमतीत सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2016 04:17 IST

जागतिक बाजारातील अतिरिक्त तेलपुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार रशिया आणि सौदी अरेबिया यांनी व्यक्त केल्यानंतर आशियाई बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या.

सिंगापूर : जागतिक बाजारातील अतिरिक्त तेलपुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी एकत्र काम करण्याचा निर्धार रशिया आणि सौदी अरेबिया यांनी व्यक्त केल्यानंतर आशियाई बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या.
अमेरिकी बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमिडिएटचे दर बॅरलमागे ८४ सेंटांनी अथवा १.८९ टक्क्यांनी वाढून ४५.२८ डॉलर झाले. ब्रेंट क्रूड तेलाची किंमतही ५ सेंटांनी अथवा 0.१0 टक्क्यांनी वाढून ४७.६८ डॉलर प्रति बॅरल झाली.
सौदीचे ऊर्जामंत्री खालेद अल फालिह आणि रशियाचे ऊर्जामंत्री अलेक्झांडर नोव्हाक यांनी वाटाघाटी करून तेलाच्या अतिरिक्त पुरवठ्यावर तोडगा काढण्यासाठी उपाय करण्याचे ठरविले. (वृत्तसंस्था)