Join us

सुधारित बातमी-सोमनाथ शेटे अकोल्यात दाखल आज स्वीकारणार आयुक्तपदाचा कार्यभार

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

अकोला: महापालिकेच्या रिक्त आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी सोमनाथ शेटे मंगळवारी सायंकाळी अकोल्यात दाखल झाले. बुधवारी सकाळी शेटे आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळतील.

अकोला: महापालिकेच्या रिक्त आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी सोमनाथ शेटे मंगळवारी सायंकाळी अकोल्यात दाखल झाले. बुधवारी सकाळी शेटे आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळतील.
मनपाचे तत्कालीन आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर १९ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेल्यानंतर आयुक्तपदाचा प्रभार अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांच्याकडे होता. अवघ्या दहा महिन्यांतच डॉ.कल्याणकर यांची २० जानेवारी रोजी नागपूर येथे बदली झाल्याने मनपाचे आयुक्तपद रिक्त होते. आयुक्तपदाचा प्रभार स्वीकारण्यास उपायुक्त दयानंद चिंचोलीकरदेखील उत्सुक होते. परंतु यादरम्यान सहा महिन्यांच्या थकीत वेतनाच्या मुद्यावरून कर्मचार्‍यांनी संप पुकारला आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी दीर्घ रजेवर जाणे पसंत केले. यावेळी मनपाच्या साहाय्यक आयुक्तपदी माधुरी मडावी नियुक्त होताच, त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्तपदाची जबाबदारी आली. तर गत तीन दिवसांपासून प्रभारी आयुक्त दिवेकरसुद्धा रजेवर गेल्याने माधुरी मडावी यांच्याकडे आयुक्तपदाचा प्रभार आपसुकच चालून आला. वरिष्ठ अधिकारी रजेवर असल्याने मनपाचे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले. यामुळे आयुक्तपदी बदली आदेश निघालेले वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ शेटे कधी नियुक्त होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शेटे यांना वर्धा जिल्हाधिकार्‍यांनी कार्यमुक्त केल्याने ते मंगळवारी सायंकाळी अकोल्यात दाखल झाले.

कोट...
जिल्हाधिकार्‍यांनी मंगळवारी कार्यमुक्त केले. बुधवारी सकाळी मनपा आयुक्तपदी रुजू होऊन कामकाज सुरू केले जाईल.
-सोमनाथ शेटे