सुधारित - मस्ट बातमी व फोटो
By admin | Updated: August 21, 2014 21:45 IST
(सर्व आवृत्यांसाठी मस्ट-आतील पानात)
सुधारित - मस्ट बातमी व फोटो
(सर्व आवृत्यांसाठी मस्ट-आतील पानात)-------------------------8 हजार शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा- तिसर्या टप्प्यातील 5 हजार प्रयोगशाळांचेमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन- 47 लाख विद्यार्थी,61 हजार शिक्षकांना लाभमुंबई - राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उभारण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून तिसर्या टप्प्यातील पाच हजार संगणक प्रयोगशाळांचे (आयसीटी लॅब्स्) प्रातिनिधीक उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज सकाळी येथे समारंभपूर्वक झाले. माहिममधील सरस्वती मंदिर हायस्कूलमध्ये झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा होते. राज्यात पहिल्या टप्प्यात 500, दुसर्या टप्प्यात 2 हजार 500 तर आजच्या तिसर्या टप्प्यात 5 हजार अशा एकूण 8 हजार शाळांमध्ये या प्रयोगशाळा आता सुरू करण्यात आल्या आहेत. आयएलएफएस आणि बिर्ला-व्हिजन इंडिया यांच्यामार्फत या प्रकल्पाची उभारणी आणि संचालन केले जात आहे. आजच्या समारंभाला राज्यमंत्री फौजिया खान आणि शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी भिडे, शिक्षण आयुक्त एस.चोकलिंगम प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाची यावेळी विस्ताराने माहिती घेतली आणि प्रशंसाही केली. या उपक्रमाचा लाभ सुमारे 47 लाख विद्यार्थ्यांना होणार आहे. 61 हजार शिक्षकांना संगणक प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्येक प्रयोगशाळेत यूपीएस, प्रिंटर, एलसीडी प्रोजेक्टर, जनरेटर, आवश्यक फर्निचर, सॉफ्टवेअर आणि इंटरनेट सुविधा देण्यात आली आहे. आजच्या उद्घाटन समारंभाला माध्यमिक विभागाचे सहसंचालक दिनकर पाटील, सरस्वती मंदिर एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन विनय रेगे, अध्यक्ष एस.एन.सुखटणकर, सचिव संजय सुखटणकर, विश्वस्त अँड.जी.आर.रेगे, पी.एन.शानबाग, प्राचार्य दीपा जुनेजा आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)-------------------------------21फोटो-----कॅप्शन - संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाजूला उभे असलेले शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, राज्यमंत्री फौजिया खान, शिक्षण सचिव अश्विनी भिडे आदी.