Join us
Daily Top 2Weekly Top 5

खरेदीच्या जोराने सोन्यात सुधारणा

By admin | Updated: June 3, 2015 00:01 IST

सोन्याचा भाव ४५ रुपयांच्या सुधारणेसह मंगळवारी २७,२७० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. जागतिक बाजारात घसरणीचा कल असतानाही स्थानिक सराफ्यात

नवी दिल्ली : सोन्याचा भाव ४५ रुपयांच्या सुधारणेसह मंगळवारी २७,२७० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. जागतिक बाजारात घसरणीचा कल असतानाही स्थानिक सराफ्यात ही तेजी नोंदली गेली आहे. दुसरीकडे चांदीचा भावही २०० रुपयांनी वधारून ३८,६०० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. व्यापाऱ्यांनी सांगितले की, सध्याच्या पातळीवर आभूषण निर्मात्यांनी खरेदी केल्याने सराफा बाजारात ही तेजी दिसून आली. सोमवारी सोन्याच्या भावाने तीन आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली होती. जागतिक बाजारात घसरणीचा कल असल्याने स्थानिक सराफ्यातील खरेदी मर्यादित राहिली.दरम्यान, सरकारने काल आयात शुल्कात कपातीचा निर्णय घेतला होता. सोन्यावरील आयात शुल्क ३८५ डॉलरवरून ३९८ डॉलर प्रति १० ग्रॅम करण्याचा निर्र्णय सरकारने घेतला आहे. चांदीच्या आयात शुल्कात कपात करून तो ५६७ डॉलर प्रतिकिलो केला.जागतिक बाजारात सिंगापूर येथे सोन्याचा भाव १,१८९.२० डॉलरवरून १,१८८.१४ डॉलर प्रतिऔंस झाला. चांदीचा भाव ०.३ टक्क्यांनी घसरून १६.७१ डॉलर प्रतिऔंस झाला. सोन्याप्रमाणेच तयार चांदीचा भाव २०० रुपयांनी वाढून ३८,६०० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव १४० रुपयांच्या तेजीसह ३८,३२० रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव कोणत्याही बदलाशिवाय खरेदीसाठी ५६,००० रुपये व विक्रीकरता ५७,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)