Join us  

मार्च एण्डपूर्वी करायची महत्त्वाची कामे, ज्यामुळे करदात्याचं आर्थिक गणित सुधारेल  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 5:53 AM

करदात्याला कलम ८० च्या अंतर्गत करामध्ये कपात मिळवायची असेल तर प्रत्येक करदात्याने  कराची देय रक्कम आणि गुंतवणूक ३१ मार्च २०२१ पूर्वी पडताळून पहावी.

उमेश शर्मा 

अर्जुन : कृष्णा, मार्च एण्डपूर्वी करावयाच्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या?कृष्ण : खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात: 

१) आर्थिक वर्ष २०१९-२० चे उशिराचे रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२१ आहे. २) आर्थिक वर्ष २०१९-२० चे रिव्हाइज रिटर्न भरण्याची शेवटची तारीख देखील ३१ मार्च २०२१ आहे. ३) एप्रिल ते जून २०२० आणि जुलै ते सप्टेंबर २०२० या दोन तिमाहींचा रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२१ आहे. ४) करदात्याने जर वर्ष २०२०-२१ चा शेवटचा आगाऊ कराचा हप्ता १५ मार्च च्या अगोदर भरला नसेल तर तो ३१ मार्च पर्यंत भरावा. ५)  करदात्याला कलम ८० च्या अंतर्गत करामध्ये कपात मिळवायची असेल तर प्रत्येक करदात्याने  कराची देय रक्कम आणि गुंतवणूक ३१ मार्च २०२१ पूर्वी पडताळून पहावी. ६)  कर्मचाऱ्याने त्याच्या गुंतवणुकीची आणि वजावटीची माहिती त्याच्या नियोक्त्याला द्यावी जेणे करून मार्च महिन्यात कमी टीडीएस कापला जाईल. ७) विवाद से विश्वास योजनेची निवड करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ८) आयकर दात्यांना आधार - पॅन लिंक करणे अनिवार्य आहे. त्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२१ आहे. ९)  फॉर्म २६ AS डाउनलोड करून टीडीएस कापलेला आहे की नाही हे पाहावे.  फॉर्म २६ AS मध्ये दिसणारे उत्पन्न खाते पुस्तकासोबत पडताळून पाहावे. दोन लाखावरील म्युच्युअल फंडाची खरेदी, १० लाखावरील चार चाकीची खरेदी, ५० लाखावरील संपत्तीची विक्री किंवा खरेदी इ. फॉर्म २६ AS मध्ये येत आहे की नाही हे पडताळून पाहावे.

१०) ज्या करदात्यांचे उत्पन्न फक्त व्याजाच्या रूपात आहे आणि आणि ते मर्यादे पेक्षा कमी आहे. ते मॅन्युअली किंवा ऑनलाईन फॉर्म १५ G/H भरू शकतात. ११) करदात्याने  घसाराची मोजणी करावी. १२) स्टॉकची पडताळणी वर्ष संपण्याच्या वेळी करावी.  अचल संपत्तीची पडताळणी करून त्याला खाते पुस्तकासोबत मॅच करावे, जर ते मॅच नाही झाले तर रिकंन्सिलिएशन बनवावे. १३)  करदात्याने सर्व बँकांचे, कर्ज खात्याचे,  मार्चअखेर रिकंन्सिलिएशन करणे खूप महत्त्वाचे आहे. १४) कंम्पेरेटिव्ह बॅलन्सशीट व प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करावे, ज्यामुळे करदात्याला मागील वर्षात झालेली उलाढाल, नफा-तोटा, खर्च इ. समजेल. 

(लेखक चार्टर्ड  अकाउंटंट आहेत)

टॅग्स :अर्थसंकल्प