Join us  

Pensioners : पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची सूचना; लवकर Life Certificate जमा करा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 6:02 PM

Important News For Pensioners : तुम्ही घरबसल्या तुमचे जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सहजपणे सबमिट करू शकता.

नवी दिल्ली : भारतात मोठ्या प्रमाणात लोक पेन्शनचा लाभ घेतात. तुम्हालाही दर महिन्याला पेन्शन मिळत असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्ही खाली नमूद केलेले काम महत्वाचे काम केले नाही तर तुमची पेन्शन येणे थांबण्याची दाट शक्यता आहे. नियमानुसार, पेन्शनधारकांना 30 नोव्हेंबरपूर्वी त्यांचे जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करावे लागेल. जर त्यांनी त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही, तर त्यांची पेन्शन थांबेल. त्यामुळे जीवन प्रमाणपत्र कसे जमा करायचे, त्याविषयी जाणून घेऊया... (Important News For Pensioners Immediately Do This Work Before 30th November Otherwise Your Upcoming Pensions)

तुम्ही घरबसल्या तुमचे जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सहजपणे सबमिट करू शकता. यासाठी तुम्हाला https://jeevanpramaan.gov.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तेथून जीवन प्रमाण अॅप डाउनलोड करा. जीवन प्रमाणपत्र हे ऑनलाईन सबमिट करताना, तुमच्याकडे UDAI द्वारे प्रमाणित केलेले फिंगरप्रिंट डिव्हाइस असणे आवश्यक आहे. त्यानंतर दिलेल्या स्टेप्सच्या मदतीने तुम्हाला तुमच्या स्मार्ट फोनद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

हे काम तुम्ही डोअर स्टेप बँकिंगच्या मदतीनेही करू शकता. दरम्यान, 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची (SBI, PNB, BOB, BOI, Canara Bank, Bank of Maharashtra, Central Bank of India, Indian Bank, Overseas Bank, Punjab and Sind Bank, UCO Bank, Union Bank of India) युती आहे, जी डोअर स्टेप बँकिंग प्रदान करते.

याचबरोबर, तुम्ही doorstepbanks.com किंवा 18001213721  या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून या सुविधेचा लाभ घेऊ शकता. अपॉइंटमेंट बुक केल्यावर एक एजंट तुमच्या घरी ठराविक वेळ आणि तारखेला येईल. एजंट जीवन प्रमाणपत्र अॅपच्या मदतीने तुमचे जीवन प्रमाणपत्र जमा करेल. डोअर स्टेप बँकिंगच्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावे लागेल. या व्यतिरिक्त, तुम्ही जीवन प्रमाणपत्राशी संबंधित सेवेचा लाभ जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमधून घेऊ शकता.

टॅग्स :निवृत्ती वेतन