Join us

सेबीची आज महत्त्वपूर्ण बैठक

By admin | Updated: November 19, 2014 01:17 IST

त्यासाठी अशा कर्जदारांबाबत असलेल्या निर्बंधांच्या नियमावलीत बदल करण्यात येणार आहेत.

मुंबई : सेबीच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी होत आहे. हेतूत: थकबाकीदार (विलफुल डिफॉल्टर) झालेल्या कर्जदारांना भांडवली बाजारात भांडवल उभारण्यावर तीन वर्षांची बंदी घालण्याबाबत सेबी विचार करीत आहे. या प्रस्तावावर उद्याच्या बैठकीत विचार होऊ शकतो. त्यासाठी अशा कर्जदारांबाबत असलेल्या निर्बंधांच्या नियमावलीत बदल करण्यात येणार आहेत. १९९२ च्या सेबी कायद्यात बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा कर्जदारांना भांडवली बाजारात व्यवहार करू देणे चुकीचे ठरणार असून, त्यांच्यावर तीन वर्षांपेक्षा अधिक काळासाठी बंदी घालण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.