Join us  

जीएसटीत चूक झाल्यास डीआरसी-०३ चलनचे महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 6:41 AM

डीआरसी-०३ म्हणजे काय?

अर्जुन (काल्पनिक पात्र): कृष्णा, डीआरसी-०३ म्हणजे काय? कृष्ण: (काल्पनिक पात्र): अर्जुना, जीएसटीत पेमेंट करायचे २ पर्याय आहेत. जेव्हा करदाता मंथली जीएसटीआर-३ ब दाखल करतो, तेव्हा तो पीएमटी-०६ चलनमध्ये जीएसटी भरतो आणि जर जीएसटीत रिटर्न दाखल झाल्यानंतर काही चूक झाली, तर करदात्यांनी ती चूक सुधारण्यासाठी डीआरसी-०३चे चलन वापरू शकतो.अर्जुन : कृष्णा, फॉर्म डीआरसी-०३ कधी दाखल केला जाऊ शकतो.कृष्ण : अर्जुना, पुढील प्रकरणांमध्ये फॉर्म डीआरसी-०३ दाखल केला जाऊ शकतो: १. सीजीएसटी नियम ४२ आणि ४३ अंतर्गत आयटीसीचे रिव्हर्सल करण्यासाठी डीआरसी-०३ चा उपयोग केला जाऊ शकतो. सदर नियमांनुसार पुढील महिन्यांच्या जीएसटीआर-०३बी वा डीआरसी-०३ द्वारे रिव्हर्सल केले जाऊ शकते. उदा. जर करदात्याची एकूण उलाढाल ही रु. १० लाख आहे आणि त्यातील रु. ६ लाख हे करमुक्त आहे. व तरीही त्यानी रिटर्न भरताना चुकीने संपूर्ण आयटीसी क्लेम केले असेल, तर उलाढालीच्या रेशिओमध्ये जेवढे आयटीसी रिव्हर्स करायचे आहे ते फॉर्म डीआरसी-०३ द्वारे करू शकतो. २. कलम ७३, ७४, ७५ आणि ७६ अंतर्गत नोटीस, कारणे दाखवा नोटीस किंवा ई-वे बिल अंतर्गत कर, कलम ५२ अंतर्गत व्याज किंवा कलम १२२ ते १२७ अंतर्गत दंड यांचे अतिरिक्त दायित्व असेल, तर ते डीआरसी-०३ द्वारे भरले जाते. ३. वार्षिक रिटर्न किंवा आॅडिटमधील अतिरिक्त कर, आयटीसी रिव्हर्स, व्याज यांचे दायित्व देखील डीआरसी-०३ द्वारे भरले जाईल.अर्जुन : कृष्णा, फॉर्म डीआरसी-०३ मध्ये कोणकोणता तपशील दाखल करणे आवश्यक आहे?कृष्ण : अर्जुना, फॉर्म डीआरसी-०३ मध्ये पुढील तपशील दाखल करावा :१. पेमेंटचे करणाऱ्यात करदात्याने पेमेंट करण्याचे कारण जसे की- ऐच्छिक-कारणे दाखवा नोटीस -वार्षिक रिटर्न -रिकंसिलेशन स्टेटमेंट-इतर. यापैकी १ कारण निवडणे आवश्यक आहे. २. पेमेंट तारीख ही स्वयंनिर्मित असेल. ३. कलम-कोणत्या कलमांतर्गत आपण दायित्वाचे पेमेंट करणार आहोत हे दाखवणे गरजेचे आहे. ४. आर्थिक वर्ष-कोणत्या आर्थिक वर्षातील दायित्वासाठी पेमेंट केले जाणार आहे, हे देखील निवडावे. ५. कर कालावधी- यात दायित्वाचा अचूक कर कालावधी टाकावा. ६. कायदा प्रकार दायित्व कोणत्या कायद्यांतर्गत ७. पुरवठ्याचे ठिकाण-कायदा प्रकारामध्ये आयजीएसटी निवडल्यावर पुढे पुरवठ्याचे ठिकाण निवडणे अनिवार्य आहे.अर्जुन : कृष्णा, फॉर्म डीआरसी-०३ चा इलेक्ट्रॉनिक कॅश लेजर व इलेक्ट्रॉनिक के्रडिट लेजर वर काय परिणाम होईल?कृष्ण : अर्जुना, डीआरसी-०३ हे एक असे चलन आहे जे करदात्याच्या फक्त इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरवर परिणाम करते. इलेक्ट्रानिक कॅश लेजर मध्ये दायित्व आणि कॅश यांचा डेबिट-क्रेडिट प्रभाव होऊन त्याचा परिणाम नील होतो. इलेक्ट्रॉनिक के्रडिट लेजरमध्ये कर कालावधीपासून उपलब्ध असेल तर डीआरसी-०३ मध्ये के्रडिट लेजरद्वारे दायित्व सेट आॅफ केले जाऊ शकते.अर्जुन : कृष्णा, डीआरसी-०३ याचे आॅडिटरसाठी काय महत्त्व आहे?कृष्ण : अर्जुना, आॅडिटरला आॅडिटचा निष्कर्ष काढताना डीआरसी-०३ हा निर्णायक पुरावा मिळतो. जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९ सी मध्ये इलेक्ट्रॉनिक लेजरबद्दल माहिती देण्यासाठी कोणतीही जागा नाही. त्यामुळे डीआरसी-०३ चा जीएसटीआर-९ आणि जीएसटीआर-९ सी वर परिणाम होत नाही. आॅडिटरला आॅडिट रिपोर्ट म्हणजेच जीएसटीआर-९ सी मध्ये नोट्समध्ये डीआरसी-०३ द्वारे भरलेल्या दायित्वासंबंधी माहिती देऊ शकतो.अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा ?कृष्ण : अर्जुना, डीआरसी-०३ हा शोले सिनेमातील सिक्क्यासारखा आहे. याचा उपयोग फक्त करदायित्व भरण्यासाठी किंवा आयटीसीचे रिव्हर्सल करण्यासाठीच होतो. यात फक्त शासनाचाच फायदा आहे. कारण, अगोदर गोळा न झालेला कर महसूल डीआरसी-०३ द्वारे गोळा केला जाऊ शकतो. करदात्यानेदेखील अतिरिक्त दायित्व हे डीआरसी-०३ द्वारेच भरावे जेणे करून, पुढील करकालावधीचे जीएसटीआर-३ ब विस्कळीत होणार नाही. डीआरसी-०३ च्या दोन बाजू या शोलेमधील सिक्क्याच्या बाजूंसारख्या अतिरिक्त दायित्वाचे पेमेंट आणि आयटीसीचे रिव्हर्सल अशा आहेत, ज्याचा फायदा शेवटी सरकारलाच होतो.

 

टॅग्स :जीएसटी