Join us  

Rupay Card असेल तर मिळवा शानदार ऑफर्स! 'या' ठिकाणी शॉपिंगवर मिळेल जबरदस्त डिस्काऊंट

By ravalnath.patil | Published: December 05, 2020 7:57 PM

Rupay Card : जर तुम्ही कपड्यांचे शौकिन असाल तर Myntra वर शॉपिंग करू शकता. Myntra कडून रुपे कार्डने पेमेंट करणाऱ्या युजर्सना 7 टक्के रिवॉर्ड पॉइंट मिळतील.

नवी दिल्ली : गेल्या महिन्यात फेस्टिव्ह सीजनच्या पार्श्वभूमीवर अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी ऑनलाइन शॉपिंगवर ऑफर्स आणल्या होत्या. या फेस्टिव्ह सीजनमध्ये अनेकांना फायदा झाला आहे. मात्र, ज्यांनी या ऑफर्सचा फायदा घेतला नाही, त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. कारण, आता सुद्धा अनेक ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून चांगले डिस्काऊंट मिळवता येईल. यासाठी तुमच्याकडे फक्त रुपे (RuPay Card) कार्ड असणे गरजेच आहे.

अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि Myntra वर ऑफरजर तुम्ही कपड्यांचे शौकिन असाल तर Myntra वर शॉपिंग करू शकता. Myntra कडून रुपे कार्डने पेमेंट करणाऱ्या युजर्सना 7 टक्के रिवॉर्ड पॉइंट मिळतील. 1 एप्रिल 2021 पर्यंत Myntra वर ही ऑफर आहे. तसेच, Amazon वर शॉपिंग करणार असाल तर तुम्हाला 10.4 टक्के रिवॉर्ड पॉइंट मिळतील. तर फ्लिपकार्टवर शॉपिंग केली तरी तुम्हाला काही ब्रँड्सवर 70 टक्के डिस्काउंट मिळेल आणि 1050 रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. फ्लिपकार्टवर ही ऑफर 1 एप्रिल 2021 पर्यंत आहे.

औषध खरेदीवरही डिस्काऊंटजर तुम्ही अपोलो फार्मसीवरून औषधे मागवली आणि रुपे कार्डने पेमेंट केले, तर तुम्हाला 10 टक्के डिस्काऊंट मिळेल. ही ऑफर या महिन्याच्या अखेरपर्यंतच आहे. याव्यतिरिक्त DocsApp वरून तुम्ही जर डॉक्टरांचा सल्ला घेतला, तर तुम्हाला केवळ 21 रुपये महिना द्यावे लागतील. या app वर RuPay कार्डने पेमेंट केल्यास तीन वेळा ही सुविधा मिळेल. मेडलाइफ वरून औषधखरेदी केल्यानंतर RuPay कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 25 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. या वर्षाअखेरपर्यंत ऑफर्स आहेत.

ट्रॅव्हल साइट्सवर डिस्काऊंटजर तुम्हाला फिरण्याची आवड आहे आणि थॉमस कुक वरून बुकिंग करण्याचा  विचार करत असाल तर तुम्हाला चांगली ऑफर मिळेल. यासाठी तुम्हाला रुपे कार्डवरून पेमेंट करावे लागेल. अशाप्रकारे पेमेंट केल्यास तुम्हाला 4 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट मिळेल. ही ऑफर 31 डिसेंबरपर्यंत आहे. त्याचबरोबर, जर तुम्ही टाटा स्काय रुपे कार्डवर रिचार्ज कराल तर तुम्हाला 200 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकेल.

टॅग्स :ऑनलाइनखरेदी