Join us

एफआरपी दिली नाही, तर गाळप परवाने रद्द

By admin | Updated: December 28, 2015 00:32 IST

राज्यातील साखर कारखान्यांनी येत्या ३ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या उसाला किमान आधारभूत किमतीनुसार दर (एफआरपी) न दिल्यास कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात येतील

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी येत्या ३ दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या उसाला किमान आधारभूत किमतीनुसार दर (एफआरपी) न दिल्यास कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात येतील,असा इशारा सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिला.पुण्यात एका बँकेच्या कार्यक्रमानिमित्त आले असताना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘एफआरपीनुसार दर न देणाऱ्या साखर कारखान्यांना राज्य शासनाने नोटीसा बजावलेल्या आहेत, असे ४६ कारखाने राज्यात आहेत. उर्वरित कारखान्यांनी एफआरपीनुसार उसाला दर देण्यास सुरूवात केली आहे. २० हजार कोटी रुपयांपैकी १९ हजार ७०० कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. उर्वरित ४६ कारखान्यांनी ३०० कोटी रूपये देणे बाकी आहे.’’ कारखान्यांवर कारवाई करणे शासनाला अवघड नाही, मात्र त्यामुळे शेतकरीच अडचणीत येऊ शकतो. कारखान्यावर कारवाई केल्यानंतर त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळपाचे काय करायचे याचे प्रश्न निर्माण होतात. सामोपचारातून मार्ग काढण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.