Join us

आयडीबीआयने आणले नवे ‘विनिंग्ज’ कार्ड

By admin | Updated: June 29, 2017 00:23 IST

आयडीबीआय बँकेने डिजिटल व्यवहारांमध्ये पुढचे पाऊल टाकत ग्राहकांसाठी ‘विनिंग्ज’ हे नवे क्रेडिट कार्ड बाजारात आणले आहे.

मुंबई : आयडीबीआय बँकेने डिजिटल व्यवहारांमध्ये पुढचे पाऊल टाकत ग्राहकांसाठी ‘विनिंग्ज’ हे नवे क्रेडिट कार्ड बाजारात आणले आहे. या कार्डद्वारे करण्यात आलेल्या खर्चावर रिवार्ड पॉइंट्स मिळतील. रूपे कार्ड असलेले हे क्रेडिट कार्ड नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या सहकार्याने ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. कॅशबॅक, डिलाइट पॉइंट्स, गिफ्ट व्हाउचर, डिस्काउंट यासह अनेक सुविधा हे विनिंग्ज सिलेक्ट क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकाला मिळणार आहेत.