Join us  

Hurun India Rich List 2018: मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, पतंजलीच्या बालकृष्णांच्या नावाचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 1:54 PM

बार्कलेज हुरून इंडियानं जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीत लागोपाठ 7व्यांदा रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींनी पहिल्या क्रमांकावर स्थान पटकावलं आहे.

नवी दिल्ली- बार्कलेज हुरून इंडियानं जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीत लागोपाठ 7व्यांदा रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींनी पहिल्या क्रमांकावर स्थान पटकावलं आहे. मुकेश अंबानी 3,71,000 कोटींच्या संपत्तीच्या एकूण मूल्यासह बार्कलेज हुरून इंडिया रिच लिस्ट 2018मध्ये सर्वात वरच्या स्तराला आहेत. त्यांच्या नंतर 1, 59, 000 कोटींच्या संपत्ती मूल्यासह हिंदुजा परिवार दुस-या स्थानी आहे. तर तिस-या क्रमांकावर जगातली सर्वात मोठी असलेल्या स्टील कंपनीच्या प्रमोटर लक्ष्मी निवास मित्तल यांचा परिवार आहे.चौथ्या क्रमांकावर विप्रोचे मालक अजिम प्रेमजी आहेत. गेल्या दोन वर्षांत देशातील 1 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची संपत्ती असलेल्या श्रीमंतांची संख्या दुप्पट झाली असून, त्यांची संख्या 339हून वाढून 831पर्यंत पोहोचली आहे. ओयो रुम्सचे 24 वर्षीय रितेश अग्रवाल या यादीत सर्वात तरुण श्रीमंत आहेत. तर एमडीएच मसाल्याचे व्यापारी असलेले 95 वर्षीय धरमपाल गुलाटी सर्वात वयस्क आहेत. या यादीत महिलांची संख्याही लक्षणीय आहे.आचार्य बालकृष्ण 11व्या स्थानी आहेत. तर पाचव्या स्थानी सन फार्माचे दिलीप सिंघवी आहे. त्यांची संपत्ती 89,700 कोटींच्या घरात आहे. सहाव्या नंबरवर कोटक महिंद्र बँकेचे उदय कोटक आहेत. त्यांची संपत्ती 78,600 कोटी रुपयांपर्यंत आहे. यादीत सायरस पुनावाला आणि गौतम अदानींचा समावेश आहे. शापूरजी यांनीही पहिल्या 10मध्ये जागा पटकावली आहे. 

टॅग्स :मुकेश अंबानी