संयुक्त राष्ट्रे : मानव विकास निर्देशांकातील (एचडीआय) १८८ देशांच्या यादीत भारत १३१ व्या स्थानी राहिला. संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत या निर्देशांकात पाकिस्तान, भुतान आणि नेपाळ यांसारख्या अगदी छोट्या देशांच्या श्रेणीत आहे.२0१५ मधील या अहवालात भारताचे स्थान आदल्या वर्षीच्या स्थानाएवढेच राहिले आहे. वास्तविक प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत चीन आणि भारतालाच प्राधान्य मिळत आहे. तरीही मानव विकास निर्देशांकात भारताची स्थिती सुधारेनाशी झाली आहे. २0१४ च्या अहवालातही भारताचे स्थान १३१ वे होते. १३१ वे स्थान भारताला ‘मध्यम मानव विकास’ या श्रेणीत ठेवते. याच श्रेणीत बांगलादेश, भुतान, पाकिस्तान, केनिया, म्यानमार, नेपाळ या देशांचा समावेश आहे.६९ टक्के लोकांनी राष्ट्रीय पातळीवरील सरकारवर विश्वास व्यक्त केला. ७४ टक्के लोकांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला.
मानव विकास निर्देशांक भारत १३१व्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2017 00:40 IST