Join us

हिंदुस्तान युनिलिव्हर काढणार उपकंपनी; करातील सवलतीचा फायदा घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 02:03 IST

नव्या उपकंपनीमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर ५०० ते ६०० कोटी गुंतवणार

मुंबई : सरकारने उत्पादन करणाऱ्या नव्या कंपनीसाठी कराचा दर २५ वरून १५ टक्के केला आहे आणि आता या सवलतीचा फायदा घेण्यासाठी बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर एक नवी उपकंपनी स्थापन करणार आहे, अशी माहिती कंपनीतील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.या नव्या उपकंपनीमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हर ५०० ते ६०० कोटी गुंतवणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सरकारने नव्याने स्थापन होणाºया उत्पादन करणाºया कंपन्यांसाठी कंपनी कराचा दर २५ टक्यावरून १५ टक्के केला. तेव्हापासून ही उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा विचार सुरू झाला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.नव्या उपकंपनीचे अधिकृत भांडवल २००० कोटी असेल. हिंदुस्तान युनिलिव्हर भारतामध्ये डोव्ह, सर्फ एक्सेल व किसान या ब्रँडद्वारे नित्योपयोगी वस्तू उत्पादन करण्याचे व विपणन करण्याचे काम करते. २०१८-१९ साली कंपनीची उलाढाल ३८,२२४ कोटी होती.संपत्तीमूल्य ३१ हजार कोटीहिंदुस्तान युनिलिव्हर ही युनिलिव्हर पीएलसी या अँग्लो-डच कंपनीची भारतीय शाखा असून गेल्या वर्षी युनिलिव्हर पीएलसीने ग्लॅक्सो स्मिथक्लाईन या कंपनीकडून उत्साहवर्धक पेयांचे हॉर्लिक्स व बुस्ट हे दोन्ही ब्रँड्स खरेदी केले होते. आता हिंदुस्तान युनिलिव्हर ग्लॅक्सो स्मिथक्लाईनचा भारतातील संपूर्ण व्यवसाय खरेदी करणार आहे. या कंपनीचे संपत्ती मूल्य ३१,७०० कोटी आहे.