Join us  

सोलापूरला बनवणार कपड्यांचा हब, उलाढाल नेणार हजार कोटींवर, २७ जानेवारीपासून प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 2:34 AM

विविध प्रकारचे कपडे तयार करण्याचे तब्बल ३१० युनिट्स सध्या सोलापुरात आहेत. हा आकडा २०२२ पर्यंत २ हजारावर नेऊन कपडे निर्मितीचा हब उभा करण्याचे व उलाढाल हजार कोटींच्यावर नेण्याचे लक्ष्य तेथील उद्योजकांनी ठेवले आहे.

मुंबई : विविध प्रकारचे कपडे तयार करण्याचे तब्बल ३१० युनिट्स सध्या सोलापुरात आहेत. हा आकडा २०२२ पर्यंत २ हजारावर नेऊन कपडे निर्मितीचा हब उभा करण्याचे व उलाढाल हजार कोटींच्यावर नेण्याचे लक्ष्य तेथील उद्योजकांनी ठेवले आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, असंघटीत उद्योग असतानाही सोलापूर जिल्ह्यात तयार कपड्यांचा उद्योग बहरत आहे. या उद्योगाला आंतरराष्टÑीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी यंदा सलग दुसºया वर्षी प्रदर्शन होत आहे. श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघाच्या पदाधिकाºयांनी गुरुवारी त्याची माहिती दिली.संघाचे सहसचिव अमितकुमार जैन म्हणाले की, सोलापुरातील या उद्योगांमध्ये प्रचंड क्षमता आहे. सध्या जवळपास २०० कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. प्रत्येक युनिटची किमान क्षमता वार्षिक ५० लाख रुपये उलाढालीची असते. त्यादृष्टीने २०२२ पर्यंत हा उद्योग हजार कोटीत नेण्याचा मानस आहे. त्यासाठी राज्य सरकारकडूनही मदतीची अपेक्षा आहे.सोलापूर चादरींसाठी ओळखले जात होते. मात्र आता सर्व गणवेषात ते आघाडी घेत आहे. यामुळेच २७ ते २९ जानेवारीदरम्यान आंतरराष्टÑीय गणवेष प्रदर्शन होत आहे. देशभरातील १४६ ब्रॅण्ड्स त्यात सहभागी होणार आहेत. १४ राज्यांमधील किरकोळ विक्रेते, वितरक येथे येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सोलापूरचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकाराने विविध राज्यांच्या वकिलातींनाही निमंत्रण देण्यात आले असून, १२ देशांनी त्यास होकार दिला आहे. मफतलाल इंडस्ट्रीजचे महाव्यवस्थापक एन.एन. गजरिया, संघाचे कार्यकारी सदस्य सतीश पवार, विजय डाकलिया, पारस शाह आदी यावेळी उपस्थित होते.पहिल्यांदाच उभे होईल ‘क्लस्टर’तंत्रज्ञानाच्या अभावामुळे येथील कपडे उद्योगात मर्यादा आहेत. यासाठीच आता ६० कंपन्यांचे क्लस्टर उभे करण्याची योजना आखण्यात आली आहे. ६.१० कोटी रुपये खर्चाच्या या क्लस्टरमधील ८० टक्के गुंतवणूक राज्य सरकारने करणे अपेक्षित आहे. त्यासंबंधी १६ जानेवारीला बैठक होणार आहे.

टॅग्स :सोलापूर