Join us

दोन डिस्प्ले असलेला HTC चा स्मार्टफोन भारतात लॉन्च

By admin | Updated: February 22, 2017 16:50 IST

HTC या स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने एचटीसी U अल्ट्रा आणि एचटीसी U प्ले हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 22 - HTC या स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने एचटीसी U अल्ट्रा आणि एचटीसी U प्ले हे दोन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत.   6 मार्चपासून या दोन्ही स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे.  
 
HTC U अल्ट्रा फोनमध्ये मेटल आणि ग्लास यूनीबॉडी डिझाइन आहे. फोनमध्ये 5.7 इंचाचा  2560×1440 पिक्सेल रिझोल्यूशन असलेला एलसीडी डिस्प्ले आहे. याशिवाय या फोनमध्ये 160×1040 पिक्सेल रिझोल्यूशनचा दूसरा डिस्प्लेही देण्यात आला आहे. या सेकंडरी डिस्प्लेवर अलर्ट आणि नेाटिफिकेशन पाहता येणार आहे.  क्वालकॉम 821 क्वाडकोर प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये  4GB रॅम आणि 64GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या  व्यतिरीक्त मायक्रोएसडी कार्डद्वारे तब्बल 2 टीबीपर्यंत ही मेमरी वाढवता येईल.  ब्लॅक ऑइल, कॉस्मेटिक पिंक आणि इंडिगो ब्ल्यू कलरमध्ये स्मार्टफोनचे व्हेरिएंट उपलब्ध आहेत.  एचटीसी U अल्ट्रा स्मार्टफोनची किंमत 59 हजार 990 रुपये एवढी आहे, तर एचटीसी U प्ले स्मार्टफोनची किंमत 39 हजार 990 रुपये आहे.
HTC U अल्ट्रा’चे फीचर्स :
– ऑपरेटिंग सीस्टिम : अँड्रॉईड नॉगट 7.0
– रॅम : 4 जीबी
– प्रोसेसर : 2.15GHz क्वाड कोअर क्वालकॉम प्रोसेसर
– डिस्प्ले : प्रायमरी 5.7 इंच, सेकंडरी 2 इंच, एचडी रिझॉल्युशन
– कॅमेरा : 16 मेगापिक्सेलचा फ्रंट आणि रिअर कॅमेरा
– मेमरी : 64 जीबी आणि 128 जीबी
– बॅटरी : 3000 mAh
‘HTC U’चे फीचर्स :
– कॅमेरा : 16 मेगापिक्सेल (रिअर, फ्रंट फेसिंग)
– कनेक्टिव्हिटी : फिंगरप्रिंट सेन्सर, बूम साऊंड, 3D ऑडिओ रिकॉर्डिंग
– बॅटरी : 3000 mAh
– व्हेरिएंट एक – 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल मेमरी
– व्हेरिएंट दोन – 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी
– 5.2 इंचाच्या स्क्रीन (1080×1920 पिक्सेल रिझॉल्युशन)
– ऑक्टाकोर मीडिया टेक हेलियो P10 प्रोसेसर