Join us

एचएसबीसीची भारतातील कर्मचारी संख्या वाढली

By admin | Updated: February 25, 2015 01:10 IST

स्वीस बँकांत भारतीयांनी ठेवलेल्या काळ्या पैशाच्या मुद्यावर चौकशीच्या फेऱ्यात सापडलेल्या एचएसबीसी बँकेच्या भारतातील कर्मचा-यांची संख्या १ हजारांनी वाढून ३२ हजार झाली आहे

लंडन : स्वीस बँकांत भारतीयांनी ठेवलेल्या काळ्या पैशाच्या मुद्यावर चौकशीच्या फेºयात सापडलेल्या एचएसबीसी बँकेच्या भारतातील कर्मचाºयांची संख्या १ हजारांनी वाढून ३२ हजार झाली आहे. कर्मचारी संख्येच्या दृष्टीने बँकेची भारतीय शाखा आता ब्रिटननंतर दुसºया क्रमांकावर आहे. एचएसबीसीच्या ताज्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. २0१४ च्या अखेरीस बँकेचे जगभरात २,६६,000 पूर्णकालीन आणि अंशकालीन कर्मचारी होते. २0१३ च्या अखेरीस बँकेच्या कर्मचाºयांची संख्या २,६३,000 होती. २0१२च्या अखेरीस ती २,७0,000 पेक्षा थोडी कमी होती. बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील कर्मचाºयांची संख्या १६,000 वरून १५,000 झाली आहे.