नवी दिल्ली : स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथील एचएसबीसी बँकेत खाते असलेल्या लोकांच्या यादीतील १२१ व्यक्ती व संस्थांविरुद्ध आयकर विभागाने ३१ मार्च २०१५ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात ४,८०० कोटी रुपयांच्या अघोषित संपत्तीप्रकरणी विविध न्यायालयांमध्ये खटले दाखल केले आहेत.जिनिव्हा येथील हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशनने जाहीर केलेल्या यादीतील २४० प्रकरणांची चौकशी आयकर विभाग करीत आहे. या भारतीयांनी परदेशात काळा पैसा लपविला असल्याचा संशय आयकर विभागाला आहे. आयकर विभागाने ३१ डिसेंबर २०१४ अखेर यातील १२८ प्रकरणांचे मूल्यमापन पूर्ण केले. या प्रकरणांतील व्यक्ती व संस्था यांनी हेतुत: कर चुकविला आहे व त्यांनी आपले उत्पन्न बेकायदा मार्गांनी स्वीस बँकेत ठेवले व अधिकाऱ्यांच्या नजरेत येऊ दिले नाही. यानंतर आयकर कायद्यानुसार कर चुकविल्याचे प्रकरण त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे फ्रान्सने एचएसबीसीला जी यादी दिली होती तीत ६२८ भारतीयांची नावे होती. यातील २०० व्यक्ती किंवा संस्था या प्रवासी भारतीय होत्या किंवा बेपत्ता होत्या.
एचएसबीसीत खाते; १२१ जणांवर खटले
By admin | Updated: May 1, 2015 23:49 IST