Join us

ONGC खरेदी करणार HPCL, 44 हजार कोटींची डील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 20:06 IST

पब्लिक सेक्टर कंपनी ऑईल अॅन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) भारतातील तिसरी मोठी तेल कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला (HPCL) विकत घेण्याची शक्यता

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - पब्लिक सेक्टर कंपनी ऑईल अॅन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) भारतातील तिसरी मोठी तेल कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला (HPCL) विकत घेण्याची शक्यता आहे. तब्बल 44 हजार कोटी रूपयांमध्ये हा सौदा होण्याची शक्यता आहे. 
 
कंपन्यांचं एकत्रिकरण करुन एकाच ठिकाणी इंधन तयार करण्याचा सरकारचा विचार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली होती. ओएनजीसी, इंडियन ऑईल, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, एचपीसीएल आणि भारत पेट्रोलियम लिमिटेड या प्रमुख तेल कंपन्या भारतात आहेत.एचपीसीएलमध्ये सरकारची असलेली 51.11 टक्के भागीदारी ओएनजीसी विकत घेऊ शकते.  यानंतर एचपीसीएलच्या अन्य शेअरहोल्डर्ससाठी अतिरिक्त 26 टक्के भागीदारी खरेदी करावी यासाठी एक खुली ऑफर आणण्याची शक्यता आहे. 
 
एचपीसीएल आणि ओएनजीसीचं विलीनिकरण झाल्यास भारत पेट्रोलियम ही कंपनी स्वतंत्र राहिल. त्यामुळे ग्राहकांना एचपीसीएल-ओएनजीसी, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या तीन कंपन्यांचाच पर्याय असेल.