Join us  

Income Tax Return 2024: इन्कम टॅक्स रिटर्न कसा फाईल कराल? पाहा सोपी पद्धत, केवळ ५ मिनिटांत फाईल होईल ITR

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 3:12 PM

Income Tax Return 2024: आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि मूल्यांकन वर्ष २०२४-२५ साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२३ आहे. आयकर विभागानं यासाठी ऑनलाइन फॉर्मदेखील जारी केले आहेत.

आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि मूल्यांकन वर्ष २०२४-२५ साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२३ आहे. आयकर विभागानं यासाठी ऑनलाइन फॉर्मदेखील जारी केले आहेत. जर तुम्ही देखील ITR भरण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती देत ​​आहोत. हे फॉलो करून तुम्ही पाच मिनिटांत तुमचा आयटीआर सहज फाईल करू शकाल. 

आवश्यक डॉक्युमेंट्स कोणती ? 

  • पॅन कार्ड आणि आधार कार्ड
  • बँक स्टेटमेंट
  • फॉर्म १६
  • देणगीच्या पावत्या (असल्यास)
  • गुंतवणूक, इन्शुरन्स पॉलिसीच्या रसिट 
  • होम लोनच्या ईएमआयच्या रसिट
  • व्याजाचं सर्टिफिकेट 

कसा भरावा इन्कम टॅक्स रिटर्न?

आयटीआर ऑनलाइन फाइल करण्यासाठी, प्रथम तुम्हाला इन्कम टॅक्सची अधिकृत वेबसाइट उघडावी लागेल. पाहूया स्टेप बाय स्टेप प्रोसिजर.  

स्टेप १: आयकर ई-फायलिंग वेबसाइट उघडा आणि पॅन क्रमांक, पासवर्ड टाकून लॉग इन करा. 

स्टेप २: आता तुम्हाला 'फाईल इन्कम टॅक्स रिटर्न' File Tax Return Online वर क्लिक करावं लागेल.

स्टेप ३: पुढील टप्प्यात तुम्हाला मूल्यांकन वर्ष निवडावं लागेल. तुम्ही आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी आयटीआर भरत असाल तर तुम्हाला असेसमेंट इयर २०२४-२५ निवडावा लागेल. 

स्टेप ४: पुढील टप्प्यात तुम्हाला फाइलिंग स्टेट निवडावं लागेल, ज्यामध्ये तुम्हाला इंडिविज्युअल, एचयुएफ आणि इतर पर्याय मिळतील. जर तुम्ही तुमचा आयटीआर भरत असाल तर तुम्हाला 'इंडिविज्युअल'वर क्लिक करावं लागेल. 

स्टेप ५: आता तुम्हाला आयटीआरचा प्रकार निवडावा लागेल. भारतात ७ प्रकारचे आयटीआर फॉर्म आहेत. यापैकी आयटीआर १ ते ४ फॉर्म इंडिविज्युअल आणि एचयूएफसाठी आहेत. 

स्टेप ६: पुढील टप्प्यात तुम्हाला ITR भरण्याचं कारण द्यावं लागेल. इकडे तुम्हाला बेसिक सूट पेक्षा अधिक टॅक्सेबल इन्कम, स्पेसिफिक क्रायटेरिया पूर्ण करावा लागेल आणि आयटीआर फाईल करणं अनिवार्य आणि अन्य पर्याय मिळतील. यापैकी एक तुम्हाला निवडावा लागेल. 

स्टेप ७ : अनेक डिटेल्स, जसं की आधार, पॅन, नाव, डेट ऑफ बर्थ, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आणि बँक डिटेल्स पहिल्यापासून सेव्ह असतात. तुम्हाला याची माहिती व्हॅलिडेट करावी लागेल. 

यासोबतच तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमचं इन्कम, सूट आणि डिडक्शनची माहितीही भरावी लागेल. यापैकी अनेक डेटा यापूर्वीच भरलेला असतो, तो रिव्ह्यू करून योग्य माहिती भरा. यानंतर तुम्हाला रिटर्नची समरी कन्फर्म करावी लागेल. डिटेल्स व्हॅलिडेट करताना जर कोणताही टॅक्स येत असेल तर तो तुम्हाला भरावा लागेल. 

स्टेप ८ : अखेरची स्टेप म्हणजे आयटीआर व्हेरिफाय करणं. यासाठी तुम्हाला ३० दिवसांचा कालावधी मिळतो. ई व्हेरिफाय करण्यासाठी तुम्हाला आधार ओटीपी, इलेक्ट्रॉनिर व्हेरिफिकेशन कोड, नेट बँकिंग किंवा ITR-V बंगळुरू कार्यालयात पाठवू शकता.  

तुम्ही स्वत:देखील इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकता. वर दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्हाला आयटीआर फाईल करता येईल.

टॅग्स :इन्कम टॅक्सव्यवसाय