Atal Pension Scheme: केंद्र सरकार प्रत्येक घटकातील नागरिकांसाठी सातत्यानं अनेक स्कीम्स आणत असते. अटल पेन्शन योजना अशा भारतीय लोकांसाठी आहे जे आयकराच्या कक्षेत येत नाहीत. वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत या योजनेअंतर्गत योगदान देऊन त्यांना वृद्धापकळात दरमहा पेन्शनची व्यवस्था करता येते. एपीवाय अंतर्गत एक ते पाच हजार रुपयांपर्यंत पेन्शन घेता येते. तुम्हाला किती पेन्शन मिळेल हे तुमच्या योगदानावर अवलंबून आहे. जर तुमचं वय १८ ते ४० च्या दरम्यान असेल आणि तुम्ही करदाते नसाल तर तुम्ही देखील या योजनेअंतर्गत नोंदणी करू शकता. यासाठी काय करावं लागेल जाणून घेऊ.
अर्ज कसा करावा?
अटल पेन्शन योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे अर्ज करू शकता. ऑफलाइन अर्ज करण्यासाठी बँकेत जाऊन फॉर्म भरावा लागेल. त्याचबरोबर नेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी नेट बँकिंगमध्ये लॉग इन करा आणि एपीवाय सर्च करा. अर्जात तुमचा तपशील भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा आणि ऑटो डेबिट मंजूर करा, जेणेकरून दर महिन्याला खात्यातून आपोआप प्रीमियम कापला जाईल. फॉर्ममध्ये नॉमिनी डिटेल्स द्यायला विसरू नका.स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
- सर्वप्रथम https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html संकेतस्थळावर जा.
- येथून तुम्ही Atal Pension Yojana टॅबवर जाऊन APY Registration क्लिक करा.
- New Registration फॉर्म भरा आणि Continue क्लिक करा.
- फॉर्म भरून संComplete Pending Registration तपशील भरा आणि KYC Complete करा.
- यानंतर Acknowledgement Number जनरेट होईल.
- वयाच्या ६० व्या वर्षानंतर तुम्हाला किती पेन्शन हवी आहे ते निवडा.
- तसेच मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक हप्ता कसा काढायचा हे सांगा.
- यानंतर नॉमिनी फॉर्म नीट भरावा.
- प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, आपल्याला एनएसडीएल वेबसाइटवरील eSign टॅबवर याल.
- आधार ओटीपी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही या योजनेशी जोडले जातील.
या कागदपत्रांची भासणार गरज
- जन्माचा दाखला, दहावीची गुणपत्रिका, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड आदी वयाचा पुरावा.
- भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र
- बँक खाते क्रमांक व शाखेची माहिती
- APY Registration Form
- आधार कार्ड