Join us
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल 6 जीबी रॅम असलेला हॉनर व्ही 9 लॉन्च

By admin | Updated: February 22, 2017 17:26 IST

Huawei या स्मार्टफोन कंपनीने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन हॉनर व्ही 9 लॉन्च केला,फोनमध्ये तब्बल 6 जीबी रॅम

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 -  Huawei या स्मार्टफोन कंपनीने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन हॉनर व्ही 9 लॉन्च केला आहे. सध्या चीनमध्येच हा फोन लॉन्च करण्यात आला असून लवकरच भारतातही लॉन्च करण्याची शक्यता आहे.
भारतात हा फोन हॉनर 8 प्रो नावाने लॉन्च केला जाऊ शकतो.  हॉनर व्ही 9 स्मार्टफोनच्या 64 जीबी व्हेरिएंटची किंमत 2,999 चिनी युआन (जवळपास 30,000 रुपये) इतकी आहे.   64 जीबी आणि 128 जीबी या दोन व्हेरिएंटमध्ये हा फोन उपलब्ध आहे.  या फोनचं सर्वात दमदार फीचर म्हणजे फोनमध्ये तब्बल 6 जीबी रॅम देण्यात आला आहे.  
हॉनर व्ही 9 चे फीचर्स-
- ऑपरेटिंग सीस्टिम : अॅन्ड्रॉईड 7.0
– रॅम : 6 जीबी
– प्रोसेसर : 1.8GHz ऑक्टाकोर 
– डिस्प्ले :   5.7 इंच 
– कॅमेरा : 8 मेगापिक्सेलचा फ्रंट आणि 12 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा
– मेमरी : 64 जीबी आणि 128 जीबी
– बॅटरी : 4000mAh