Join us

हिवरेबाजार प्राथमिक शाळेची इमारत राज्याला दिशादर्शक : मंजुषा गुंड

By admin | Updated: June 25, 2015 23:51 IST

हिवरेबाजार : जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या माध्यमातून हिवरेबाजारच्या वैभवात आणखीच भर पडणार आहे. जि. प. शाळेची ही नवीन इमारत राज्यात आदर्श ठरणार असल्याचे जि. प. च्या अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी सांगितले.

हिवरेबाजार : जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या माध्यमातून हिवरेबाजारच्या वैभवात आणखीच भर पडणार आहे. जि. प. शाळेची ही नवीन इमारत राज्यात आदर्श ठरणार असल्याचे जि. प. च्या अध्यक्षा मंजुषा गुंड यांनी सांगितले.
हिवरेबाजार (ता. नगर) येथे नवीन इमारतीच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, जि. प. चे उपाध्यक्ष अण्णा शेलार, आदर्शगाव संकल्पनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, बाळासाहेब दिघे, मीराबाई चकोर, नंदाताई वारे, शरद नवले, बाळासाहेब हराळ, माधवराव लामखडे, ग्रामविस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे, सरपंच सुनीता पवार, रामदास हराळ उपस्थित होते.
यावेळी गुंड म्हणाल्या, हिवरेबाजार येथील विकासकामांच्या माध्यमातून ग्रामस्थांची एकजूट नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून शिकण्यास मिळते. यावेळी पवार यांनी या इमारतीमध्ये सहा खोल्या, प्रयोगशाळा, लायब्ररी अशा प्रकारे वेगळ्या, रचनात्मक पद्धतीने शाळेची इमारत उभारणार आहे. जवळपास ३३ लाख रूपये व लोकवर्गणीतून २ लाख रूपये असे ३५ लाख रूपये किमतीची इमारत उभारणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. टी. पादीर यांनी केले तर आभार भाऊसाहेब ठाणगे यांनी मानले.
फोटो : हिवरेबाजार येथील जि. प. शाळेच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन करताना जि. प. अध्यक्षा मंजुषा गुंड.