Join us  

हिंदुजा भावांमध्ये 'त्या' एका पत्रावरुन वाद; तब्बल ८३ हजार कोटींच्या संपत्तीचं प्रकरण कोर्टात 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 11:11 AM

हे प्रकरण मंगळवारी लंडनच्या एका कोर्टात सुनावणीसाठी समोर आलं.

ठळक मुद्दे८३ हजार कोटींच्या संपत्तीच्या वादातून हिंदुजा ब्रदर्स कोर्टात २०१४ च्या पत्रामध्ये उल्लेख, एका भावाकडे असलेली संपत्ती सर्वांची आहे या पत्राचा कायदेशीर वापर होऊ नये, यासाठी श्रींचद आणि त्यांच्या कन्येची कोर्टात धाव

नवी दिल्ली - सुप्रसिद्ध उद्योगपती हिंदुजा ब्रदर्समध्ये सध्या एका पत्रावरुन मोठा विवाद तयार झाला आहे. या पत्रात हिंदुजा कुटुंबाच्या ११.२ अरब डॉलर्स म्हणजे जवळपास ८३ हजार कोटींच्या संपत्तीवरुन वाद निर्माण झाला आहे. २०१४ मधील या पत्रात उल्लेख आहे की, एका भावाजवळ जी संपत्ती आहे ती सर्वांची आहे. पण ८४ वर्षीय श्रीचंद हिंदुजा आणि त्यांची कन्या विनू यांनी या पत्राला स्वीकारण्यास नकार दिला आहे.

हे प्रकरण मंगळवारी लंडनच्या एका कोर्टात सुनावणीसाठी समोर आलं. त्यानंतर न्यायाधीशांनी सांगितले, इतर तीन भाऊ गोपीचंद, प्रकाश आणि अशोक यांनी या पत्राचा वापर हिंदुजा बँकेवर आपला ताबा प्रस्थापित करण्यासाठी केला, पण त्यावर श्रीचंद हिंदुजा यांचा संपूर्ण हक्क आहे. श्रीचंद आणि त्यांची कन्या विनू यांनी कोर्टाकडे विनंती केली आहे की, या पत्राचा कायदेशीर परिणाम होणार नाही, त्याला संपत्ती विवरण पत्र म्हणून उपयोग करु नये असा निर्णय कोर्टाने द्यावा असे न्यायाधीश म्हणाले. 

एका युक्तीवादात तीन भावांनी सांगितले की, या प्रकरणी पुढील सुनावणी कुटुंबाच्या सिद्धांताविरोधात जाईल. अनेक दशके हे सुरु आहे, सर्वकाही प्रत्येकाचे आहे, कशावरही एकाचा अधिकार नाही. तीन भावांनी सांगितले आम्ही कुटुंबाच्या या विचारांचा सन्मान ठेऊ इच्छितो. जर कोर्टाने तीन भावांचा दावा मंजूर केला तर श्रीचंद यांच्यावर नावावर जेवढी संपत्ती आहे ती त्यांची मुलगी आणि इतर कुटुंबाच्या नावावर होईल. 

श्रीचंद यांच्या संपत्तीत हिंदुजा बँकेचे संपूर्ण शेअर्स आहेत. वयोमानानुसार श्रीचंद यांच्याकडे ताकद उरली नाही त्यामुळे त्यांनी मुलगी विनू हिला नियुक्त केले आहे. हिंदुजा कुटुंब जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांपैकी एक आहे. त्यांचा उद्योग जवळपास १०० वर्षापासून सुरु आहे. फायनान्स,मीडिया आणि हेल्थ केअर उद्योगात ४० पेक्षा अधिक देशात हिंदुजा ग्रुपचा बिझनेस पसरला आहे. ब्लूमबर्ग बिलिनेयर्स इंडेक्सनुसार हिंदुजा कुटुंबाकडे तब्बल ८३ हजार कोटींपर्यंत संपत्ती आहे. 

 

टॅग्स :न्यायालय