Join us  

फक्त अदानीच नाही, जगातील 'या' श्रीमंतांचीही संपत्ती झपाट्याने कमी झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2023 3:24 PM

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले. या आरोपामुळे अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या पाच महिन्यापूर्वी उद्योगपती गौतम अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते.

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समुहावर घोटाळ्याचे आरोप केले. या आरोपामुळे अदानी समुहाच्या शेअरमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या पाच महिन्यापूर्वी उद्योगपती गौतम अदानी हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते, पण, आज ते टॉप-20 मधूनही बाहेर आहेत. 

हिंडेनबर्गने आपल्या अहवालात अदानी समूहावर 'जगातील सर्वात मोठी कॉर्पोरेट फसवणूक' केल्याचा आरोप केला आहे. हा अहवाल 24 जानेवारीला आला होता. या अहवालात अदानी समूहाबाबत स्टॉक मॅनिपुलेशन-अकाउंटिंग फ्रॉडसह अनेक दावे करण्यात आले आहेत. अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र हा अहवाल आल्यापासून अदानी समूहाला आता 8 लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

Adani समूहासाठी खूशखबर; जगातील ‘या’ मोठ्या रेटिंग एजन्सीनं दाखवला भरवसा

अदानी समूहाचे समभाग घसरत आहेत. याचाच परिणाम म्हणजे श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी यांचे स्थानही घसरत चालले आहे. शुक्रवारी ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये गौतम अदानी २१व्या क्रमांकावर आले आहेत. या वर्षात आतापर्यंत त्यांना 59.2 बिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे आणि यापैकी 52 बिलियन डॉलर फक्त गेल्या 10 दिवसात क्लिअर झाले आहेत.

फोर्ब्सच्या मते, शुक्रवारी अदानीची एकूण संपत्ती आणखी कमी होऊन 56 अब्ज डॉलर झाली. गौतम अदानी हे एकमेव नाहीत ज्यांची संपत्ती इतक्या वेगाने कमी होत आहे. याअगोदरही अनेकजणांची संपत्ती कमी झाली आहे. टॉप-20 मध्ये आणखी 6 श्रीमंत लोक आहेत ज्यांची संपत्ती सतत कमी होत आहे.

लॅरी एलिसन

ओरॅकलचे संस्थापक लॅरी एलिसन यांच्याकडे ओरॅकलचा 35% हिस्सा आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, लॅरी एलिसनला एका दिवसात 205 मिलियन डॉलर म्हणजेच 1,686 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या त्यांची एकूण संपत्ती 102 अब्ज डॉलर आहे.

कार्लोस स्लिम

कार्लोस स्लिम हे मेक्सिकोमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अमेरिका मोव्हिल या लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीच्या मालक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1.56 डॉलर अब्ज (रु. 12,830 कोटी) नी घसरली आहे. सध्या त्यांची एकूण संपत्ती ८४.२ अब्ज डॉलर (६.९२ लाख कोटी रुपये) आहे. 

मुकेश अंबानी

मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आहेत. ते भारतातील सर्वात श्रीमंत आहेत. आता त्यांची एकूण संपत्ती 82.5 अब्ज डॉलर्स (6.78 लाख कोटी रुपये) आहे. अंबानींची एकूण संपत्ती 5,715 कोटीनी घसरली आहे. ब्लूमबर्ग इंडेक्समध्ये अंबानी 12व्या तर फोर्ब्सच्या यादीत 11व्या स्थानावर आहेत.

जिम वॉल्टन

वॉलमार्ट कंपनीचे संस्थापक सॅम वॉल्टन हे सर्वात लहान मुलगा आहेत. ते अर्नेस्ट बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीत 283 दशलक्ष डॉलर घट झाली आहे. सध्या त्यांची एकूण संपत्ती 61.4 अब्ज डॉलर आहे.

रॉब वॉल्टन

वॉलमार्टचे संस्थापक सॅम वॉल्टन यांचा मोठा मुलगा. 1992 मध्ये वडिलांच्या निधनानंतर ते कंपनीचे चेअरमन झाले. ब्लूमबर्गच्या मते, त्यांची एकूण संपत्ती 259 दशलक्ष डॉलरनी कमी झाली आहे. सध्या त्यांची एकूण संपत्ती 60.2 अब्ज डॉलर आहे.

टॅग्स :गौतम अदानीव्यवसाय